कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार

योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड

नागपूर, दि. 31: रेशीमबाग मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला.या समारंभास केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मान्यवरांचे महिलांनी उत्स्फूर्त स्वागत केले. भव्य आकाराच्या सहा डोममध्ये सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक महिलांच्या प्रत्येक डोममध्ये जाऊन मुख्यमंत्री व मान्यवरांनी स्वागताचा स्वीकार केला.

मध्य प्रदेश सीमेवरील रामटेक तालुक्यातील अतिदुर्गम भागापासून सर्व तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थित कार्यक्रमाला होती.प्रत्येक तालुक्यातून महिलांना आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था व पदोपदी घेतलेली सुरक्षितता लक्षवेधी ठरली. महिलांना आरोग्याचा त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेण्यासमवेत इतर आवश्यक व्यवस्थाही प्रत्येक वाहनांमधून करण्यात आली होती.

वैशाली सामंत यांनी बहिणींना धरायला लावला ठेका

सकाळी अकरा वाजल्यापासूनच भगिनींचा उत्साह पाहायला मिळाला.ना कुठली कुरबुर… ना कुठली तक्रार. यात गायिका वैशाली सामंत यांनी प्रथितयश गाण्यांसह बहिणींना भावणारे विविध गाणे सादर करून ठेका धरायला लावला. सोबत देशभक्तीपर गीत सादर करून सभागृहाची मने जिंकली.

आर्थिक स्तर उंचावण्यास तसेच मुलांच्या शिक्षणासाठी या योजनेची मदत होईल.निम्न मध्यमवर्गीय कुटुंबीयांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरली आहे.दरमहा मिळणारी 1500 रुपये ही रक्कम अत्यंत सहाय्यकारी असल्याचे प्रातिनिधीकरित्या बहिणींशी संवाद साधताना अधोरेखित झाले.

कोणत्याही स्थितीत ही योजना बंद होणार नाही,असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यामुळे बहिणी आश्वस्त होऊन समारंभ स्थळावरून घराकडे मार्गस्थ झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top