शेतकऱ्यांच्या योजना राबविण्यात भाजपला अपयश : खासदार प्रणिती शिंदे यांची भाजप सरकारवर टीका….!

अक्कलकोट:- अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी आणि म्हैसलगे या गावांमध्ये झालेल्या गावभेट दौऱ्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले पण ती प्रत्यक्ष उतरवण्यात ते पूर्णपणे अपयाशी ठरले आहेत अशी घणाघाती टीका केली प्रणिती खासदार शिंदे म्हणाल्या भाजप सरकारने लाडकी बहिण योजना सुरू केली असली तरी इतर खात्यांचा निधी वळवून योजना वर अन्याय केला. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा गरजूंसाठी असलेल्या योजनांची उपेक्षा होत आहे. काँग्रेस पक्षाने देशासाठी आणि सामान्य जनतेसाठी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले.

कार्यक्रमाला अक्कलकोट तालुका काँग्रेसचे नूतन अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा, उपाध्यक्ष अरुण जाधव, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, सरपंच महेश पाटील, शिवयोगी लाळसंगी, श्रीमंत देसाई, सोमनाथ धोदयाळे, गौडप्पा पाटील, सिद्धाराम बुरहानपुरे, दशरथ नाव्ही, श्रीशैल भतगुणकी, राहुल कुलकर्णी, सुभाष बिराजदार, सिद्धया स्वामी आदिउपस्थित होते.

या दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली अक्कलकोट हा तालुका काँग्रेस विचारसरणीचा पाईक आहे. मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असेन काँग्रेस पक्षाने जे ठरवले ते केले आहे मी कुणालाही वाऱ्यावर सोडत नाही. तुम्हीही काँग्रेस सोबत सोबत ठामपणे उभे रहा असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थितीना केले.

यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील म्हणाले काँग्रेस पक्ष एक मोठी विचारधारा आहे १५० वर्षाची परंपरा लाभलेला पक्ष आजही देशाच्या प्रगतीसाठी झटत आहे. काँग्रेसने कधीच जनतेला फसवले नाही. काँग्रेसच्या पाठीशी ठाम उभे रहा कारण याच पक्षाचे भविष्य उज्वल आहे.

माजी नगराध्यक्षा डॉ. सुवर्णा मलगोंडा यांनी सांगितले की माझ्या मातोश्री पार्वतीबाई मलगोंडा यांना काँग्रेसने मंत्रीपद दिले होते. मलाही नगराध्यक्ष पद दिले मी कायम काँग्रेसची एकनिष्ठ राहीना आणि भविष्यात राजकारणात अधीक सक्रिय होईन

या गावभेट दौऱ्याला स्थानिक ग्रामस्थ तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला गावकऱ्यांनी खासदार शिंदे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top