पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव

पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०९/२०२४- पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे राज्य नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमप्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीला सर्व विधीज्ञांचे आभार मानून आपला परिचय करून देताना शालेय जीवनापासून आतापर्यंतचा राजकीय प्रवासाला उजाळा देत वकील बंधूंच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्याचा विश्वास दिला.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी वकील संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि ज्येष्ठ विधिज्ञांचा शाल,फेटा आणि पैठणी साडी देऊन सपत्नीक सन्मान केला.

या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पंढरपूर आधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.1 सप्टेंबर 2024 रोजी येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड पंढरपूर येथे करण्यात आले होते.

यावेळी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष राजेश चौगुले, उपाध्यक्ष महेश कसबे, सचिव अभयसिंह देशमुख,सदस्य निकिता अवताडे, संदीप रणनवरे,पराग जहागीरदार, समाधान गायकवाड,विजयकुमार नागटिळक,विलास साळुंखे,गणेश चव्हाण,कीर्तिपाल सर्वगोड, रेखा यादव यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, शशिकांत पाटील, संतोष कवडे, गणेश पिंपळनेरकर, महेश पवार, नानासाहेब कदम,पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top