महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी दाखल असलेल्या केस मधून आरोपीची जामीनावर मुक्तता..!

सोलापूर:- यात एफ.आय.आर.मधील हकीकत अशी की, दिनांक 9-2-2025 रोजी दुपारी बारा वाजता चे सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर असताना यातील आरोपी मुस्तफा शमशुद्दीन शेख हा काही कारण नसताना फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ केली फिर्यादीने त्यास अश्लील भाषेत शिवीगाळ करू नको असे म्हणत असताना आरोपी ने घाण घाण शिवीगाळ केली. आरोपी हा गावातील इतर आशा सेविकांना सुद्धा ॲम्बुलन्स मध्ये पुढे बस नाहीतर तुला घेऊन जात नाही असे म्हणून वारंवार त्रास देत होता.फिर्यादीला व इतर अशा सेविकांना वारंवार अश्लील शिवीगाळ करून व रात्री फोन करून अश्लील भाषेत बोलून तसेच फिर्यादी व इतर अशा सेविका यांना शारीरिक वाईट स्पर्श करून फिर्यादीला व इतर अशा सेविका यांना मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याने फिर्यादी यांनी आरोपी विरुद्ध अक्कलकोट पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता. त्यामध्ये आरोपीविरुद्ध कलम 74,75,78,79,352 भारतीय न्याय संहिता प्रमाणे व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(w)(i),3(1)(w)(ii),3(1)(r),3(1)(s),3(2)(va) लागले होते.यात आरोपीला अटक होऊन मे. न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.

त्यामुळे आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता.त्यावेळी आरोपीचे वकिलांनी युक्तीवादामध्ये आरोपी विरुद्ध लावलेले सर्व आरोप खोटे व बिनबुडाचे असून आरोपी हे 108 ॲम्बुलन्स चालक असून त्याच्यावर सूडबुद्धीने खोटा गुन्हा दाखल केलेला आहे असे सांगितले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्हि. केंद्रे साहेब यांनी वीस हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.

यात आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य,ॲड जितेंद्र अरुण मोरे,ॲड हर्षल शाक्य,ॲड अजिंक्य शाक्य,ॲड दर्शना चक्रवर्ती,ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top