सोलापूर:- महाराष्ट्र शासन संस्कृतीक विभाग कडून महाराष्ट्र राज्यातील भजनी मंडळाला गणेशोत्सव कालावधी साठी 25000/- अनुदान जाहीर झाले असून शेवट तारीख 06-09-2025 आहे. भजन हे समाज संघटित करून सुसंस्कृत करणेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे अनुदान जाहीर केले आहे. या अनुदान नियमामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे आहे. त्यामध्ये ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत दाखला व शहरांसाठी महानगर पालिका दाखला असा एक नियम आहे. 1सप्टेंबर पर्यंत सो म पा ला शासनाने त्या संबंधी कळवले नव्हते. म्हणून मुदतवाढ मिळावी असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज व प्रदेश अध्यक्ष जोतिराम चांगभले यांनी श्री कुमार आशीर्वाद साहेब जिल्हाधिकारी सोलापूर यांना विनंती केली. त्यामुळे त्यांनी चर्चा करणेसाठी बैठक बोलावली होती. सविस्तर चर्चा झाली आणि त्या संबंधी प्रशासना कडून सहकार्य ही सुरु झाले आहे.
तसेच नोंदणीकृत मंडळाला अनुदान मिळणार व ट्रस्टचे पॅनकार्ड आवश्यक आहे. ते जर नसेल तर अध्यक्षचे पॅनकार्ड ग्राह्य धरावे अशी मागणी करणेतआली व मुदतवाढ संबंधी आपण शासन स्तरावर प्रयत्न करून आम्हाला सहकार्य करावे असे निवेदन देण्यात आले.
