सोलापूर:- सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने पालखी मार्गावर देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची युध्दपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे.आज पालखी मार्गावरील विविध सुविधांची व पालखी तळाची अंतीम टप्प्यातील कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केली. वाखरी पालखी तळांवर पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर ग्रामपंचायतीचा विद्युत रोषणाई केली आहे.पालख्या सोलापूर जिल्ह्यात आगमन होण्यापुर्वी शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी येथील सुविधा अंतीम टप्प्यात असून पुर्णत्वाकडे नेल्या जात आहेत.मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आज वाखरी व भंडाशेगाव येथील पालखी तळ , स्नानगृहाची व्यवस्था तसेच शौचालय बसविणेची ठिकाणे आदी कामांची पाहणी केली.त्यांचे समवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) अमोल जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, बांधकाम विभागाचे उपअभियंता लोटके , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता करवटे, यांचे सह विभाग प्रमुख उपस्थित होते.
वाखरी येथे पाण्याच्या टाकीवर विद्युत रोषणाई

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या नवीन पाण्याच्या टाकीवर विद्युत रोषणाई केली आहे.भाविकांना पुरेसे पिण्याचे वापरा साठी पाणी उपलब्ध करून देणेत येत आहेत.आज या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसेच प्रकल्प संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी पाहणी केली.परिसरात शौचालया साठी तसेच स्नानगृहासाठी च्या पाण्याची व्यवस्थेची पाहणी केली.
वारकरी यांची सेवा म्हणून काम करा – अतिरिक्त सिईओ कोहिणकर
पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींनी खुप निष्ठेने काम करीत आहात.या सेवेत तसूभर देखील कमतरता पडू देऊ नका.सेवा म्हणून काम करा. अशा सुचना अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी दिल्या.पंचायत समिती पंढरपूरच्या शेतकी सभागृहात त्यांनी अंतीम टप्प्यात असलेल्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) स्मिता पाटील , गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सह विभाग प्रमुख व पंचायत अधिकारी उपस्थित होतें.
निवास व्यवस्थासाठी जर्मन हॅंगर मंडपाची उभारणी अंतिम टप्प्यात आहे.या सर्व ठिकाणी विद्युत सेवा, मोबाईल चार्जिंग सेवा तसेच या ठिकाणी जाणारे मार्गाची दुरुस्ती चा आढावा अतिरिक्त सिईओ कोहिणकर यांनी घेतला.
ग्रामसेवक व नोडल अधिकारी यांची बैठक
वाखरी येथे जर्मन हँगर मंडप
वाखरी ता.पंढरपूर येथील जर्मन हँगर मंडप पाहणी ट जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केली. , बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी पंढरपूर समाधान नागणे, ग्रामपंचायत वाखरी च्या सरपंच श्रीमती धनश्री साळुंखे माजी सरपंच व विद्यमान सदस्य कविता पोरे ग्रामपंचायत अधिकारी एस.एस.शिंदे यांचेसह मंडप व पालखी तळाची पाहणी केली.