मॅरेथॉन विजेत्या गणरायाची वाघचवरे हॉस्पिटलमध्ये मोठ्या थाटात प्रतिष्ठापना….!

सोलापूर, प्रतिनिधीः- तंदुरूस्त शरीर ठेवण्यासाठी विविध मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा असा संदेश देणार्‍या गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना जुळे सोलापुरातील वाघचवरे हॉस्पिटल मध्ये करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सव साजरा करताना आजच्या तरूण पिढीला आगळा वेगळा संदेश द्यावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी या हेतुने वाघचवरे परिवाराने मॅरेथॉन मध्ये सहभागी होवून विजयी झालेल्या मुद्रेतील गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. गणपतीच्या मंडपात सर्व स्पर्धांची आकर्षक सजावट आणि मांडणी केलेली आहे. डॉ. सत्यजित वाघचवरे आणि डॉ. अभिजित वाघचवरे या बंधूनी सोलापूर मॅरेथॉन पासून सुरू केलेला मॅरेथॉनमध्ये सहभागी होवून आणि शारीरीक सृदृढता ठेवण्याचा प्रवास तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध मॅरेथॉन मध्ये विविध विक्रम करण्याच्या घटनांची मांडणी या गणेशोत्सवामध्ये त्यांनी केली. सोलापूर, सातारा, मुंबई, दक्षिण आफ्रिकेतील डर्बन मधील कॉम्रेड मॅरेथॉन तसेच दोन वेळा आर्यनमॅनचा किताब डॉ. वाघचवरे यांनी मिळवला

त्या सर्व आठवणी तसेच मेडलचे प्रदर्शन त्यांनी गणपती मुर्तीच्या समोर मांडले आहे. गणेश मुर्ती तर मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होवून विजयी झालेल्या मुद्रेत आहे. मुर्तीच्या डोक्यावर टोपी आणि हातात भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा असून सर्व भाविक भक्तांना राष्ट्र प्रेम आणि शारीरीक सृदृढतेचा संदेशच या गणेश मुर्तीकडून देण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा आगळा वेगळा उपक्रम डॉ. सत्यजित वाघचवरे, डॉ. अभिजित वाघचवरे, डॉ. राजश्री वाघचवरे, डॉ. शुभांगी वाघचवरे, डॉ. स्मिता झांझुर्णे यांनी साकारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top