नवी दिल्ली/सोलापूर, 2 सप्टेंबर 2025 — इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी, नवी दिल्ली संचलित प्रतिष्ठित “द गुड पॉलिटिशियन 2025” कार्यक्रमासाठी युवा पॅंथर संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडी चे नेते “पॅंथर आतिश बनसोडे” यांची निवड झाली असून महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचा आश्वासक चेहरा असलेले नेतृत्वाची निवड ही सोलापुरातील बौध्द समाजासाठी अभिमानाचा क्षण आहे. इंडियन स्कुल ऑफ डेमोक्रेसी कडून प्राप्त निवड-पत्रानुसार 920+ अर्जांमधून असाधारण सार्वजनिक नेतृत्व क्षमता, प्रामाणिकता आणि बांधिलकी याच्या आधारे निवड करण्यात आली आहे; सदर कार्यक्रम 9 महिन्यांचा अनुभवाधारित असून जमीनी पातळीवरील नेतृत्व घडवतो. “द गुड पॉलिटिशियन” कार्यक्रमात निवासी शिबिरे, साप्ताहिक ऑनलाइन सत्रे, स्थानिक फील्डवर्क आणि राष्ट्रीय पातळीवरील नेटवर्किंग यांचा समावेश आहे; अभ्यासक्रमात सार्वजनिक कथा बांधणी, जनसंघटन, अल्पखर्चातील प्रचार, निधी उभारणी, मतदारसंघीय डेटा समज, वादविवाद-कौशल्य आणि राज्यघटना-प्रशासन यांसारख्या कौशल्यांवर भर दिला जातो.पॅंथर आतिश बनसोडे हे “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिक्षित बना, संघर्ष करा, संघटित व्हा’ हे प्रेरणासूत्र अंगीकारून तत्त्वनिष्ठ आणि लोकाभिमुख राजकारण घडवण्याचे प्रयत्न अधिक जोमाने करत असुन ; ही निवड महाराष्ट्रातील बहुजन युवांसाठी नवी ऊर्जा देणारी आहे” इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी ही पक्षनिरपेक्ष संस्था असून तत्त्वनिष्ठ, सेवाभावी राजकीय नेतृत्व घडविण्याचे ध्येय बाळगते; 2025 च्या बॅचसाठी निवड शिबिरे व पारदर्शक प्रक्रियेद्वारे सहभागी ठरवले जातात.सदर संस्था मूल्यांवर आधारित संघटन, जनजागृती आणि तरुण नेतृत्वनिर्मितीसाठी कटिबद्ध सामाजिक-राजकीय मंच; महाराष्ट्रासह विविध ठिकाणी प्रशिक्षण, मोहिमा व जनसंवाद उपक्रम राबवते Indian School of Democracy (ISD) देशभरातील उदयोन्मुख जमीनी नेत्यांना तत्त्वनिष्ठ राजकारणासाठी तयार करणारी पक्षनिरपेक्ष संस्था; “द गुड पॉलिटिशियन”, “डेमॉक्रसी एक्सप्रेस” आदी कार्यक्रमांद्वारे दीर्घकालीन प्रशिक्षण आणि अल्युमनी नेटवर्क प्रदान करते. ह्या निवडीमुळे समाजातील तरुणांमध्ये आणि नेत्यांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण निर्माण झाले असुन बौद्ध समुहातील तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असुन तत्वनिष्ठ राजकारणाकडे कुच करण्याचा मार्ग अधिकच बळकट झाला आहे असे मत समाज बांधवामध्ये निर्माण झाले आहे.
