सोलापूर | प्रतिनिधी :-
सोलापूर शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सोलापूर पोलीस दल आता पूर्णपणे आक्रमक झाला आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार आणि उपायुक्त विजय कबाडे हे दोन अधिकारी सध्या गुन्हेगारीविरोधात ‘सिंघम’ शैलीत धडक कारवाया करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे, तर काहींना MPDA (महाराष्ट्र प्रतिबंध अधिनियम) अंतर्गत थेट तुरुंगात धाडण्यात आले आहे.
MPDA कायद्यातर्गत थेट तुरुंगात!
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी MPDA कायद्यानुसार आयुक्त एम. राजकुमार यांनी अनेक गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपींविरुद्ध फाईल्स उघडल्या आहेत. या कायद्यानुसार आरोपींना न्यायालयीन परवानगीशिवाय थेट तुरुंगात डांबता येते. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले असून, पोलीस दलाच्या कडक धोरणाचा परिणाम दिसून येत आहे.
तडीपार आदेशांची मालिका
उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली MIDC, जेलरोड, विजापूर रोड, होटगी रोड आणि सिटी पोलीस स्टेशन हद्दीत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५च्या पहिल्या सहामाहीतच ५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, हे सर्व गुन्हेगार अनेकदा खुन, दरोडा, , महिलांवरील अत्याचार यासारख्या गंभीर गुन्ह्यांत सामील होते.

शहरात ‘सिंघम जोडी’ची चर्चा
सोलापुरात सामान्य नागरिकांमध्ये आता पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे. आयुक्त एम. राजकुमार आणि डीसीपी विजय कबाडे यांच्या कामगिरीला नागरिक ‘सिंघम जोडी’ म्हणून संबोधत आहेत. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे गुन्हेगारीचा आलेख घसरला आहे आणि शहरात कायदा-सुव्यवस्थेचा अंमल दिसून येतो आहे.
गुन्हेगारांवर कडक नजर, सामान्यांसाठी मोकळा श्वास
शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधून गुन्हेगारांवर सातत्याने नजर ठेवली जात असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचे डोजियर तयार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर MPDA, MCOCA, NDPS, आणि Arms Act अंतर्गत कारवाया सुरू आहेत. गुन्हेगार कुठल्याही राजकीय अथवा सामाजिक वलयात लपलेले असले तरी त्यांच्यावर कुठलीही दयामाया न ठेवता कारवाई केली जात आहे.
“सोलापूर गुन्हेगारीमुक्त करणे हे आमचे ध्येय!” – आयुक्त एम. राजकुमार
“गुन्हेगारीला शून्य सहनशीलता हे धोरण आम्ही स्वीकारले आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल अहोरात्र काम करत आहे.”
“गुन्हेगारांना इशारा – सुधाराच नाहीतर तडीपार व्हा!” – डीसीपी विजय कबाडे
“सोलापुरात गुन्हेगारांसाठी आता जागा उरलेली नाही. ज्यांना सुधारायचे नाही, त्यांना आम्ही कधीही शहराबाहेर करू. पोलिसांचा धाक गुन्हेगारीच्या प्रत्येक झपाट्यावर असणार आहे.”