परजिल्ह्यातुन येवुन पंढरपूरमध्ये महिंद्रा बोलेरो जिप चोरी करणाऱ्या चोरास अमरावती जिल्ह्यातुन पंढरपूर शहर पोलीसांनी केले गजाआड
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०३/०४/२०२५- शहरामध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे चार चाकी वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क्र. MH11AK2198 ही चोरीस गेल्याने पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. १४९/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दि.०१/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गोपनिय बातमीदारामार्फत तसेच काही तांत्रीक पध्दतीने तपास केला असता सदरचा गुन्हा हा आरोपी महंमद मुदस्सीर महंमद युनूस वय २८ वर्षे धंदा मजुरी रा. उत्तमचंद प्लॉट, तारफेल अकोला जि. अकोला याने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपीचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन गुन्ह्यात चोरीस गेलेले वाहन महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची बोलेरो प्लस जिप क्र.MH11AK2198 हे आरोपीच्या ताब्यात मिळुन आल्याने ती गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करून सदरची जिप ही पंढरपुर पोलीस ठाणेस आणुन जप्त करण्यात आलेली आहे.

सदरची कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉ.अर्जुन भोसले,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे,पो.स.ई.राजेश गोसावी, स.पो.फौ.शरद कदम, पो.ह.सुरज हेंबाडे,पो.ह.प्रसाद औटी, पो.ह. सचिन हेंबाडे, पो.ह.विठ्ठल विभुते,पो.शि.शहाजी मंडले,पो.शि.समाधान माने,पो.कॉ.बजीरंग बिचुकले,पो.कॉ.निलेश कांबळे,पो.का. विनोद पाटील तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पो.शि.रतन जाधव यांनी केली आहे.