अखेर सी.ओ. यांच्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात झाली जेष्ठ पत्रकार कुलकर्णी यांच्या तक्रारीला यश…..!

नांदेड- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले वाहनाची नंबर प्लेट पांढऱ्या रंगात होती तर ती गाडी परमिट पासिंगची असल्यामुळे नंबर प्लेट पिवळा रंगात असावी म्हणून जेष्ट पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी आरटीओ मध्ये तक्रार केल्यावर व त्याचा पाठपुरावा केल्यावर अखेर नंबर प्लेट पिवळ्या रंगाची लावण्यात आली. पण आतापर्यंत नियमबाह्य सदरील गाडी वापरात आणली त्याच्या दंडाचे काय?
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड मीनल करणवाल यांनी टोयोटा गाडी नंबर एम. एच.२६ सि एच७२०९ ही गाडी २२८० रुपये दररोज भाडे या दराने २०२३ मध्ये योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल नांदेड यांचे कडून भाडेतत्त्वावर घेतली. सदरील गाडी परमिट पासिंगची असल्यामुळे तिची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असावी लागते. पण परमिट नंबर प्लेट ची गाडी वापरण्यास चांगले वाटत नसावे म्हणून गाडी मालक योगीराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स ने पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट लावून गाडीचा वापर सुरू केला. ही बाब नियमबाह्य असून व एका उच्च पदस्थ आय ए एस अधिकाऱ्याकडून नियमाचा भंग केला जातो. हे ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी संबंधित वाहनावर व त्यांच्या मालकावर कारवाई करून दंड आकारावा अशी तक्रार प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांच्याकडे केली होती. पण हे आर.टी.ओ अधिकारी कारवाई करत नव्ह्ते. उडवा उडवीची उत्तरे देत होते. सदरील गाडी सापडत नाही व दिसतही नाही असेही उत्तर सखाराम कुलकर्णी यांना लेखी स्वरुपात दिले होते. पण एकदा तक्रार केल्यावर त्याचा निपटारा केल्याशिवाय कुलकर्णी गप्प बसत नाहीत. त्यानुसार त्यांनी कारवाईचा पाठपुरावा चालूच ठेवला. गाडी जिल्हा परिषद कार्यालयात उभी असल्यावर कुलकर्णी आरटीओला माहिती देत होते. त्यावर आरटीओचे अधिकारी स्काॅड यायले, असे उत्तर अधिकारी कुलकर्णी ला देत होते. पण काहीच नाही. एक वर्षापासून कुलकर्णी यांनी केलेल्या तक्रारीस व पाठपुराव्यास यश येऊन अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी आपल्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्याची पिवळ्या रंगात लावली. पण ऑगस्ट २०२३ पासून गाडी नियमबाह्य नंबर प्लेट लावून गाडी वापरण्यात येत होती. त्या गाडी मालकास दंड आकारला पाहिजे. त्या दंडाचे काय असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला. नंबर प्लेटचा हा प्रकार जिल्हा परिषद मध्ये मोठा गाजत होता व शेवटी नंबर प्लेट बदलल्यावर व नियमाप्रमाणे पिवळी नंबर प्लेट लावल्यावर जिल्हा परिषद मधील बऱ्याच जणांनी तसेच मित्र मंडळींनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top