अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल व पोलिस प्रशासनाची कारवाई -तहसिलदार सचिन लंगुटे

कारवाई करत चार वाहने केली जप्त

पंढरपूर ,दि.03:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या पथकाने माण व भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे तीन अशोक लेलँडचे पिकअप व ट्रॅक्टर अशी एकूण चार वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणारां विरोधात कारवाई करण्यासाठी पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तहसिलदार सचिन लंगुटे यांनी विविध पथकांची नेमणूक केली आहे.दि.०३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ३.०० वाजता महसूल व पोलीस पथकाने माण नदी पात्रामध्ये अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या अशोक लेलँड कंपनीचे वाहन क्रमांक एमएच ०९ एफएल एमएच ०९ एफएल -६३८४ व बिगर नंबर वाहन तसेच मौजे गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात स्वराज्य कंपनीचा ट्रॅक्टर पकडून जप्त करण्यात आला आहे.सदर वाहने शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे लावण्यात आली आहेत.

या कारवाईमध्ये मंडळ अधिकारी पंकज राठोड,ग्राम महसूल अधिकारी साईनाथ अडगटाळे,नवनाथ मोरे,सरताज मुजावर , पोलीस पाटील दत्तात्रय जाधव,महसूल सेवक साहेबराव भोपळे व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधीर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राम खेडकर व होमगार्ड महेश कुंभार सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top