बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

बार्शीमध्ये लोकसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

तलाठी आणि महसुल सहाय्यक यांच्यावर गुन्हा दाखल

बार्शी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०४/२०२५ – आरोपी लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या धनाजी, शिरामे,पद तलाठी (वर्ग- ३),नेमणूक सज्जा ताड सौंदणे,तहसिल कार्यालय बार्शी अंतर्गत,रविंद्र आगतराव भड पद महसुल सहाय्यक (वर्ग- ३),नेमणूक तहसिल कार्यालय बार्शी यांनी तक्रारदाराकडे १७,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम यातील आरोपी लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांनी स्वतः स्विकारल्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबात माहिती अशी आहे की,सुरवातीला तक्रारदार यांचेकडे २०,०००/- रुपये लाचेची मागणी करून पडताळणी कारवाई दि.२५/०२/२०२५ दरम्यान १७,०००/- रू लाचेची मागणी करण्यात आली.सापळा कारवाई दि.२६/०२/२०२५,दि. २७/०२/ २०२५ व दि. १८/०३/२०२५ रोजी करण्यात आली मात्र यशस्वी सापळा कारवाई दि. ०३/०४/२०२५ रोजी करण्यात आली.

यातील तक्रारदार यांनी त्यांचे पत्नीचे नावे आलेल्या शेतजमीनीचा महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये वाटप पत्र होवून त्यांचे मुलाचे नावे होणेकरीता तलाठी कार्यालय ताड सौंदणे यांचेकडे दि.०५/०२/ २०२५ रोजी अर्ज सादर केला होता. सदर अर्जाचे अनुषंगाने यातील तक्रारदार पाठपुरवा करत असताना यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे पद तलाठी यांनी सादर केलेल्या अर्जावरुन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये प्रस्ताव तयार करुन तो तहसिलदार बार्शी यांचेकडून मंजुर करुन त्याबाबतचे आदेश काढणेकरीता स्वतःकरीता तसेच इतरांकरीता असे म्हणून १७,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारली आहे. तसेच यातील लोकसेवक रविंद्र भड,पद महसूल सहाय्यक, तहसिल कार्यालय बार्शी यांनी श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांचे लाच मागणीस संमती तसेच प्रोत्साहन देवून बेकायदेशीर वर्तन केले आहे म्हणून यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे,पद तलाठी,रविंद्र भड पद महसुल सहाय्यक यांचे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ. १२ प्रमाणे बार्शी शहर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, , ला.प्र.वि.,पुणे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.शीतल जानवे/खराडे ला.प्र.वि.,पुणे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी ला.प्र.वि., पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार एसीबी सोलापूर यांच्या सापळा पथकात सदरची कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक एसीबी सोलापूर,पोलीस अंमलदार पोहेकों/अतुल घाडगे, पोहेकों/ सलिम मुल्ला, पोना / स्वामीराव जाधव, मपोकों/ प्रियंका गायकवाड, चा.पो.ह. राहुल गायकवाड, चा.पो.शि.शाम सुरवसे सर्व नेमणूक ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्हयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भ्रष्टाचारा संबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा यासाठी- पोलीस उपअधीक्षक, ॲन्टी करप्शन ब्युरो श्री छत्रपती शिवाजी महाराज, रंगभवन चौक सोलापूर. संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार ॲप – acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक १०६४
दुरध्वनी क्रमांक ०२१७-२३१२६६८
व्हॉटस ॲप क्रमांक- ९९३०९९७७०० यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक ॲन्टी करप्शन ब्यूरो सोलापूर युनिट पुणे परिक्षेत्र सोलापूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top