इलेक्ट्रो – 2025 प्रदर्शनास खासदार प्रणिती शिंदे यांची भेट
ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारांकडूनच वस्तू खरेदी करण्याचे खासदार प्रणिती शिंदे यांचे आवाहन

साेलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/२०५- सोलापूर इलेक्ट्राॅनिक्स डिलर्स असाेसिएशन द्वारा इलेक्ट्राेनिक्स, काॅम्प्यूटर्स,साेलार व फिटनेस इक्विपमेंटस वस्तू,हाेम अॅप्लायन्सेस,टेलिकम्युनिकेशनचे प्रदर्शन इलेक्ट्राे 2025 दि.12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत हाेम मैदानावर हे प्रदर्शन आयाेजित करण्यात आले आहे.

मोठ्या संख्येने नागरिक या प्रदर्शनास भेट देत आहेत. आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी इलेक्ट्राे 2025 या प्रदर्शनास भेट देऊन स्टॉल ची पाहणी करून माहिती घेतली.यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा स्थानिक दुकानदारां कडूनच वस्तू खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

यावेळी अध्यक्ष आनंद येमुल, दीपक मुनोत, शिवप्रकाश चव्हाण,जितेंद्र राठी,केतन शहा, भूषण भुतडा,सूरजरतन धूत,हरीष कुकरेजा, सुयाेग कालाणी, ईश्वर मालू, कुशल देडीया, गिरीश मुंदडा,संदेश कोठारी,यल्लाप्पा भोसले, बसवराज नवले, चंद्रकांत शहापुरे, राजेश जाजू, विजय टेके, रवी पाचलिंग, यांच्यासह सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.
