शाळकरी मुलीचा पाठलाग करुन केला विनयभंग
एका विरुध्द गुन्हा दाखल…..

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०२/ २०२५- एका 17 वर्षीय शाळकरी मुलीचा शाळेला येता जाता पाठलाग करुन तु मला खूप आवडतेस मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे आहे असे म्हणून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्या प्रकरणी दयानंद बापू लवटे रा.तनाळी ता पंढरपुर याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील 17 वर्षीय अल्पवयीन फिर्यादी मुलगी ही दि.29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान एका शैक्षणिक संस्थेत शाळेला जाता येता तिचा पाठलाग करुन आरोपी दयानंद लवटे याने हात पकडून तु मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करावयाचे असे म्हणून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याचा अधिक तपास मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करीत आहेत.
