श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके

श्री रुक्मिणी विद्यापीठ संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर शाळेत योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका सौ सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री माताजी निर्मलादेवी प्राथमिक उच्च प्राथमिक विद्यामंदीर पंढरपूर शाळेत जागतिक योग दिना निमित्त योग प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम घेण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अमर सूर्यवंशी, पालक महाबीर शर्मा व श्री आंद उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष कवडे सर होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेच्या पूजन करून झाली. योगशिक्षक अनलदीप टापरे यांनी मंत्रोपचारासह सूर्यनमस्कार घेतले. मुलांनी उत्कृष्टपणे प्रात्यक्षिक केले.

प्रमुख पाहुणे श्री अमर सूर्यवंशी यांनी योग ही एक जीवन पद्धती आहे. ती सर्वांनी अनुसरावी असे सांगितले.

स्पर्धेच्या युगात योगाचे खूप महत्त्व आहे. शरीर व मनस्वास्थ्या साठी सर्वांनी योग करावा असे आव्हान श्री कवडे सर यांनी केले.

वटपौर्णिमेनिमित्त प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेमध्ये बांबू व पिंपळ यांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती यादव मॅडम, लाडे मॅडम, आगावणे सर साळुंखे सर,मुजावर सर यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.आभार महेश भोसले सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top