रोजा इफ्तारीतून सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- येथील मुर्शदबाबा दर्गा येथे रमजान महिन्यानिमित्त रोजा इफ्तारचे आयोजन रवी सर्वगोड यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.या कार्यक्रमात विविध समाजातील लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश दिला.

रमजान हा इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या काळात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्ता पर्यंत उपवास पाळतात.अन्न,पाणी आणि भौतिक सुखांचा त्याग करून आत्मसंयम,शिस्तप्रियतेवर भर दिला जातो.हा महिना फक्त धार्मिक उपासना करण्यापुरता मर्यादित नसून, सामाजिक बांधिलकी जपण्याचाही महिना आहे.

सूर्यास्तानंतर मगरीबच्या अजानने रोजा सोडण्यात आला. याप्रसंगी विविध धर्मीय आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते. शाहनवाज मुलाणी,सईद सय्यद,जावेद भालदार,मुसा मुजावर,इस्माईल बोहरी,शफी मुलाणी,सलीम सय्यद,फैयाज सय्यद,रौफ मुलाणी,अशपाक देवळे,गौस नाडेवाले, मक्का मस्जिद पेशईमाम,शोयब बोहरी, मुश्ताक अत्तारी,इम्रान मणेरी,इम्रान तांबोळी, ज्ञानोबा सर्वगोड,गणेश सर्वगोड,राजेंद्र सर्वगोड,शाहू सर्वगोड,सतिश सर्वगोड, अमोल पाटील, सिद्धनाथ सांवत,शरद सोनवणे,प्रफुल्ल कांबळे यांच्यासह अनेकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
