राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) द.ह.कवठेकर प्रशालेचे नेत्र दीपक यश
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (NMMS) सन 2024- 2025 मध्ये नेत्रदीपक यश संपादन केले असून प्रशालेतील सात विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले आहेत.या परीक्षेत प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी धवल यश संपादन केले आहे.

आणेराव जय योगेश,कु.गवळी श्रेया सचिन, मुंढे कार्तिक उत्रेश्वर,सुनगार कार्तिक परशुराम,कांबळे समर्थ विजय,उताड सोहंम विलास(सारथी),पवार म्हमाजी युवराज (सारथी)
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. एम. डी.बाड मॅडम,संतोष पाटोळे सर,आर.डी.कुलकर्णी सर, सौ. सोनाली इंगळे मॅडम यांनी केले.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एस.आर. पटवर्धन सर,संस्थेचे अध्यक्ष नाना कवठेकर,चेअरमन विणाताई जोशी,प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही.एम.कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक एम.आर.मुंडे सर,पर्यवेक्षक आर.एस. कुलकर्णी सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत प्रतिवर्षी सुमारे 12000/- रुपये पर्यंत स्कॉलरशिप शासनाकडून प्राप्त होणार आहे.
