मनसे सहकार ने उभी केली 51 फुटी गुढी…
मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज- गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष महेश फरकासे यांनी मालाड पूर्व येथे उभे केलेल्या एक्कावन फुटी गुढीचे पूजन मनसेचे राज्याचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव, मनसे मुंबई उपशहराध्यक्ष कुणाल माईणकर,विभाग अध्यक्ष भास्कर परब, सहकार सेनेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे, वैभव भोर,संजय धावरे,सुधीर पवार आदी सह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

