उत्तर सोलापूर:- होनसळ येथील डीएम प्री प्रायमरी दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय मध्ये 79 स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वसंत जाधव माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोमपा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंट्रल रेल्वेचे टीसी अधिकारी दत्तात्रय माने हे होते. संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे संस्थेच्या संचालिका माजी सभापती रजनीताई भडकुंबे होनसळच्या सरपंच सविता ताई गायकवाड विठाबाई हेडे संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे सचिव विकास बनसोडे सहसचिव अमित भडकुंबे माजी विद्यार्थी सुयोग गायकवाड प्रणाली गायकवाड प्रल्हाद साबळे अण्णाराव गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम प्रसंगी प्रशालीतून दहावी बारावी प्रथम आलेले विद्यार्थी अस्पीया पटेल आरती गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच देशाच्या संशोधन क्षेत्रात काम करणारा प्रशालेचा माजी विद्यार्थी सुयोग गायकवाड यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी नर्सरी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सामुदायिक कवायत देशभक्तीपर गीते भाषणे सादर केली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पवार प्रास्ताविक उमेश जगताप आभार तात्यासाहेब तांबे यांनी मानले. कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी होनसळ राळेरास हगलूर गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
