सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेत ७९ वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण सोलापूरचे खासदार .कु.प्रणिती ताई शिंदे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी संस्थेचे हितचिंतक . श्री चंद्रकांत साबळे गुरुजी तर प्रमुख अतिथी म्हणून श्री.मारुती माळगे श्री सिद्राम फुले गुरुजी चेअरमन श्री दिपक फुले सर सचिव, श्री.मनोज यलगुलवार सर,संस्थापिका सौ शारदा फुले मॅडम, श्री. मारुती कुमार, श्री. विठ्ठलराव आयगोळे, श्री.गोपाळराव आयगोळे ,श्री.व्यंकटेश मुळे, श्री.सिद्राम पेद्दे,श्री. लक्ष्मण पेद्दे, श्री. संतोष गायकवाड( लिपिक ),श्री.नारायण सूर्यवंशी सर मुख्याध्यापक व पालक वर्ग ,विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आला. देशभक्तीपर गीतावर कवायत संचलन झाले अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांची भाषणे झाली. इ.५ वी व ७ वी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर तिरंगी ओढण्याने नृत्य सादर केले. खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी मुलांना लोकशाहीचे रक्षण करा आणि लोकशाही बळकट करा खूप शिका असे शुभेच्छा दिल्या .उत्कृष्ट भाषणाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना कु. रेश्मा म्हेत्रे मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन कुमारी राजश्री फुले मॅडम यांनी केले तर आभार श्री. किरण गाटे सरांनी मांडले
