अक्कलकोट(तालुका प्रतिनिधी)दि.२१-अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे रेल्वे स्टेशन च्या अंडर ग़्राऊंड रस्त्याचे काम चालु असल्यांने पूर्वीच्या रहदारी रस्ता बंद आहे. पर्यायी रस्ता तयार करुनच काम चालु करण्यात यावे.अशी मागणी रिपब्लिकन पक्ष(आठवले गट)चे जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्याकडे केली आहे.
दुधनी रेल्वे स्टेशनजवळ सध्या अंडर ग्राउंड ब्रिजचे काम सुरू आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना गावात ये जा करण्यासाठी,पर्यायी रस्ता नसल्याने अनेक समस्यांना तोंडद्यावे लागत आहे.सध्या वाहतुकीसाठी असलेला पर्यायी मार्ग कच्चा व अत्यंत सादा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. विशेषतः गर्भवती महिला,वयोवृद्ध माणसे, लहान मुले आणि विद्यार्थ्याना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. चिखल व धुळीमुळे परिसरातील हवेची प्रदूषण दूषित होत आहे.
या जर्जर रस्त्यामुळे नागरिकांना शाळा, रुग्णालये आणि दैनंदिन कामांसाठी ये-जा करण्यासाठी हा एकच रस्ता असल्याने लोकांना रहदारी साठी बिकट व अत्यंत कठीण झाले आहे.सध्या सुरु असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल साचला आहे, ज्यामुळे ये-जा करणारी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच, पावसाच्या पाण्याचा निचरा याच ब्रिजच्या जवळून होत असल्याने तिथे पाणी साचून मोठी समस्या निर्माण झाली आहे.
तरी या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन पर्यायी मार्गाची त्वरित व्यवस्था करून योग्य उपाययोजना करावी, जेणेकरून नागरिकांचे सुरक्षित सुनिश्चित होईल.
या समस्यांचे निवारण करण्याची ही मागणी केली आहे.तरी लवकरात लवकर जातीने लक्ष घालून पर्यायी रस्ता बनवण्यात यावी अन्यथा रिपब्लिकन पक्ष(आठवले गट)च्या वतीने आंदोलने छेडण्यात येईल.अशा इशारा रिपाइं चे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सैदप्पा झळकी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनावर सैदप्पा झळकी व रिपाइं दुधनी शहर अध्यक्ष
श्री.गोरखनाथ धोडमनीयांच्या सह्या आहेत.
