सोलापूर:- महाराष्ट्रातील प्रख्यात संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर अलका रवींद्र सोरटे यांचा 50 वा वाढदिवस AR News Network आणि कौटुंबिक वातावरणात आनंदाने साजरा करण्यात आला. डॉक्टर अलका सोरटे या गेल्या 30 वर्षापासून सर्व महिलांच्या मानसिक आणि मनो शारीरिक आजारावर समुपदेशन आणि मानसिक उपचार करीत आहेत. त्यांनी अनेक महिलांना त्यांच्या समूपदेशनाने निराश मुक्त केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी डॉक्टर अलका सोरटे यांना शुभेच्छा देऊन त्यांचे शुभचिंतन केले.
