सोलापूर, १८ मे २०२५ सकाळी ०६:०३ वाजता सोलापूर येथील एमआयडीसी अक्कलकोट रोडवरील सेंट्रल टेक्सटाईल इंडस्ट्री मध्ये भीषण आग लागल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाण हे CISF युनिट SSTPP सोलापूरच्या हद्दीबाहेर असूनही, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने CISF चा एक अग्निशमन वाहन व १५ अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सुमारे २० कि.मी. अंतरावर असलेल्या ठिकाणी हे पथक ०६:४० वाजता पोहोचले.
CISF च्या अग्निशमन पथकाने राज्य अग्निशमन विभागाच्या ५ इतर अग्निशमन बंबांसह मिळून जवळपास १२ तास चाललेल्या बचाव व आग विझविण्याच्या मोहिमेत भाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व CISF युनिट SSTPP सोलापूरचे आसिस्टंट कमाडेंट (फायर) श्री. एस. के. यादव यांनी केले. दीर्घ आणि अत्यंत श्रमसाध्य असलेल्या या मोहिमेत बी शिफ्टचे कर्मचारी पुढे येऊन मूळ पथकाला आराम दिला.
या दुर्घटनेत दुर्दैवाने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य प्रशासनाने CISF च्या वेळीच व तत्परतेने दिलेल्या मदतीचे कौतुक केले आहे.