नागरी सत्कारावेळी एड. रा. गो. म्हेत्रस, दत्ता गायकवाड यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर दि. १५ (प्रतिनिधी) – सफाई कामगारांच्या आयुष्यात अजूनही स्वातंत्र्यची पहाट उगवलेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटनेने त्यांना दिलेले अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचु दिले जात नाहीत. उलट कायद्यात बदल करून त्यांना अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे, अश्या स्थितीत सोलपुरच्या बाली मंडेपु यांच्याकड़े संघटनेचे प्रदेशयाध्यक्ष आले असून हा सफाई कामगारांच्या प्रश्नांना ते राष्ट्रीय पातळीवर मांडून हा काटेरी मुकुट लीलया सांभाळतील, असा विश्वास जेष्ठ कामगारा नेते एड. रा. गो. म्हेत्रस आणि आंबेडकर विचारवंत दत्ता गायकवाड़ यांनी व्यक्त केला.
येथील निर्मलकुमार फड़कुले सभागृहात आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळयात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर जेष्ठ विचारवंत एम. आर. कांबळे, मिल्ली कौन्सिलचे राष्ट्रीय उप महासचिव निजमोद्दीन शेख, कामगार नेते अशोक इंदापुरे, अशोक जानराव, चतुर्थ श्रेणी कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष आशुतोष नाटकर, अजित बनसोडे, दत्ता थोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
सफाई कामगारांच्या प्रश्नांसाठी गेल्या सहा दशकांपासुन लढ़ा देणाऱ्या अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस या राष्ट्रीय संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल एड. रा. गो. म्हेत्रस यांच्या हस्ते बाली मंडेपु यांचा सोलापुर वाशियांच्या वतीने मानपत्र, शाल, हार आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना एड. म्हेत्रस यांनी कामगार कायद्यात केले गेलेले बदल हे कामगरांची मुस्कटदाबी आणि शोषण करणारे असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले जग सुंदर ठेवण्याचे काम करणारे सफाई कामगार हे सफाई वाले असले तरी ते आरोग्य सेवेशी संबधित आहेत. जर स्वछता बंद झाली तर जनारोग्य बिघडेल. त्यामुळे सफाई कामगारांना आरोग्यसेवक नाम देऊन आरोग्य या अत्यावश्यक सेवेचा दर्जा मिळायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली.
दत्ता गायकवाड़ यांनी कोंग्रेस काळात रेल्वेतील चतुर्थ श्रेणी ही श्रेणीच नष्ट केल्याचे सांगून कोणतीही सरकारे आली तरी कामगारांचा संघर्ष थांबणारा नसल्याचे सांगितले. यावेळी अशोक इंदापुरे यांनी एकटया सोलापुर महापालिकेत साडेतीनशे सफाई कामगारांच्या वारसांच्या नियुक्त्या प्रलंबित असून राज्यभरात हा आंकड़ा हजारोंच्या संख्येत असल्याचे सांगितले. यावेळी अशोक जानराव, निजमोद्दीन शेख, आशुतोष नाटकर आदिनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. दशरथ अड़ाकोल्लू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर युवराज माने यांनी आभार मानले.