भवानीनगर : सणसर येथील आझाद तरुण मंडळाचा गेल्या अनेक वर्षापासूनच्या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपित करीत असलेल्या विविध सामाजिक कार्याबद्दल मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी मा.पोलीस अधीक्षक कार्यालय, पाषाण, चव्हाणनगर, पुणे भीमाशंकर हॉल येथे राष्ट्रपती पदक विजेते मा.श्री सुनील फुलारी सो ,विशेष पोलीस महानिरीक्षक (IG) ,कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या शुभहस्ते व मा.श्री पंकज देशमुख सो,पोलीस अधीक्षक(SP) पुणे ग्रामीण व मा.श्री. रमेश चोपडे,सहाय्य पोलीस अधीक्षक(Addl.SP),मा. श्री.राजकुमार डुणगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक(API), वालचंदनगर पोलीस स्टेशन व श्री. बाळासाहेब शिंदे- पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना, अध्यक्ष व सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पुणे ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरावर ग्रामीण विभागामध्ये इंदापूर ताुक्यातील उत्कृष्ट तरुण मंडळ म्हणून प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सदरचा सन्मान आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश शिंदे, मंडळाचे सेक्रेटरी गणेश जाधव, सणसर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शरद कांबळे यांनी स्वीकारला.
गेली 45 वर्षापासून आझाद तरुण मंडळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून मंडळाच्या श्री गणेशाची वै. ह.भ.प. गणपत बुवा काळे महाराज यांच्या शुभहस्ते प्राणप्रतिष्ठा झालेली असून मंडळाला महाराष्ट्र शासन लोकमान्य महोत्सव अंतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक रुपये रोख 25,000 रोख, प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह तसेच वालचंदनगर पोलीस स्टेशनचा चार वेळा मानाचा गणराया अवॉर्ड तसेच दै.लोकमत सन 2023 चा सातत्यपूर्ण उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल लोकमत गणनायक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सणसर गावाला सन 2009-10 चा गाव तंटामुक्तीचा रक्कम रुपये 10 लाखाचा पुरस्कार मिळवून देण्यात या मंडळाचा मोठा सहभाग आहे. सदरच्या सत्काराबद्दल आझाद तरुण मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

