सोलापूर:-पदमनगर – कर्णिक नगर बास्केटबॉल संघाचा 16 वा वर्धापन दिन 1 मे 2025 गुरुवारी संध्याकाळी 6.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थीतीत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दैनिक तरुण भारतचे उपसंपादक अजीत संगवे सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून सेंट जोसेफ हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रीडाशीक्षक राजेंद्र गोटे सर व प्रमुख् उपस्थीती म्हणून खांडेकर सर यांनी स्थान ग्रहण केले. तसेच कर्णिक भागातील सामाजिक कार्यकर्ते श्री सुशील नाटकर , डी.आर श्रीराम इंग्लीश स्कूलचे श्री परांडकर सर, बीबीदारफळचे सहशीक्षक श्रीशैल गुरव सर, पालक प्रतिनीधी म्हणून माने काकू, गुरव काकू अश्वीन येदूर श्रीधर ताटीपामूल विशाल बनसोडे ,प्रशीक्षक श्रीधर गायकवाड सर , प्रशीक्षक प्रबुध्द चिंचोलीकर सर, , आनंद वल्लाकटी सर हेही या कार्यक्रमास उपस्थीत होते. प्रारंभी उपस्थीत मान्यवरांचा सत्कार शाल व बुके देऊन करण्यात आला. अध्यक्ष श्री संगवे यांचा सत्कार सुशील नाटकर यांनी, श्री गोटे यांचा सत्कार श्री गायकवाड यांनी तर श्री खांडेकर यांचा सत्कार श्रीधर ताटीपामूल यांनी केला.
यानंतर बीबीदारफळचे मुख्याध्यापक श्रीशैल गुरव यांना राष्टीय स्तरावरील आदर्श मुख्याध्यापकाचा पुरस्कार गोवा येथे मिळाल्याबददल मान्यवरांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर वर्धापन दिनाचा केक मान्यवरांच्या व बास्केटबॉल संघातील ज्युनिअर खेळांडूच्या उपस्थीतीत कापण्यात आला. उपस्थीत मान्यवरांपैकी श्री राजेंद्र गोटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी या वर्धापन दिनाच्या उपक्रमाबददल कौतुक केले व सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच खेळाडूंना फिटनेस टीप्स दिल्रूया. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजीत संगवे या उपक्रमाचे तोंड भरुन कौतुक केले. खेळाडूंना शीस्त पाळण्याचे आवाहन केले. मोबाईलचा कमीत कमी वापर करुन खेळातून आपल्या शारिरीक तंदुरुस्तीकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचे आवाहन केले. असे कार्यक्रम कुठे बघायला मिळत नाही ही परंपरा अशीच पुढे जपा. असे मनोगत व्यक्त केले. वर्धापन दिनानिमित्त मुलांना अल्पोपहार देण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद वल्लाकाटी यांनी केले. सदर काय्रक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशीक्षक श्रीधर गायकवाड , प्रबुध्द चिंचोलीकर , अंजली वल्लाकाटी , तेजश्री मसरे ,श्रीशैल गुरव , श्रीधर ताटीपामूल, विशाल बनसोडे व आनंद वल्लाकाटी सर यांनी दोन- तीन दिवसापासून सुरेख नियोजन करण्यासाठी परीश्रम घेतले.
