नांदेड:(प्रतिनिधी अनंतोजी कलिदास) धर्माबाद तालुका हे महाराष्ट्र- तेलंगणा राज्याच्या सिमेवर असल्याने दोन्हीही राज्यांचा संबंध आर्थिक व्यवहार च नसुन तेलंगणा राज्याशी रोटी-बेटीचे संबंध जोडलेले आहे.धर्माबाद शहर हे मिरचीचे मोठे आगार असुन मिरचीसह हळद आणि धने पावडरसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत व्यवहार चालविले जाते. या बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक वरच्यावर वाढत राहिल्याने धर्माबादची मिरची बाजारपेठ म्हणुन प्रसिद्ध आहे.बाजार समिती आवारात लाखो रुपयांची मिरचीची आर्थिक उलाढाल होते. धर्माबाद तालुक्यात मिरची लागवडीचे क्षेत्र कमी असले तरी लगतच्या तेलंगणा आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातून मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक बाजार समितीत होते. या ठिकाणी धर्माबादसह हैदराबाद, खम्मम, वरंगल, ब्याडगी (कर्नाटक) , सोलापूर, गुलबर्गा या ठिकाणांवरून मिरची विक्रीसाठी येते. ग्राहक देखील मिरची खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात. तसेच धर्माबादची गावरानी आणि तेजा या प्रसिध्द मिरच्या असून त्यांना अधिक मागणी असते. गुंटुर,सी-फाईव्ह,सी-झेंडा,बँडगी,टु सेव्हन थ्री,एसटेन,सीएस, डीडी,सुवर्णा या विविध नमुने नावाची लाल मिरचीचे ही विविध प्रकार असून वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या मिरची धर्माबादच्या बाजार समितीत येतात.यानंतर धर्माबाद शहरातच लाल मिरचीची पावडर तयार करून महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश तेलंगणा राज्यासह विदेशातही पाठवली जाते.
धर्माबाद शहरात लाल मिरची पावडर बनवण्यासाठी मोठी औद्योगिक वसाहत आहे .या औद्योगिक वसाहतीत तिखट लाल मिरची पावडर म्हणली की धर्माबादच्या तिखट मिरचीची आठवण येते.या औद्योगिक वसाहतीत एकुण १५ मिरची कांडप असुन तिथे पावडर बनविले जाते.या भागात मिरची लागवडीचे उत्पादन क्षेत्र कमी असून लगतच्या तेलंगणा, आंध्रप्रदेश,कर्नाटक भागातुन मिरचीची आयात करून येथील व्यापारी धर्माबादेत पावडर करून विकतात हे विशेष आहे.मिरची तेलगंणाची, पावडर मात्र धर्माबादची.याच धर्माबाद औद्योगिक वसाहत मधुन मिरची खरेदी करून व्यापारी पावडर तयार करतात. धर्माबाद शहरातील काही व्यापारी मिरची पावडर बनवून पॅकिंग सुद्धा येथेच करून राज्यात व परराज्यात तसेच विदेशात पाठवली जाते. मिरचीच्या देठ काढण्यापासून ते मिरची पावडर ची पॅकिंग करण्यापर्यंतच्या उद्योगात शहरातील जवळपास १००० लोकांना यामुळे रोजगार मिळत आहे.यामुळे प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळत आहे. येथील मिरची पावडर घेण्यासाठी तेलंगणातील निझामाबाद, हैद्राबाद,कामारेड्डी ,म्हैसा,बोधन,साठापूर,नंदीपेट,बासरी,मुधोळ आदी परिसरातुन व नांदेड जिल्ह्यातील च नसुन महाराष्ट्रातील विविध तालुक्यातील नागरीक, महिला धर्माबाद शहरात येतात. मिरचीचे यावर्षीचे दर १०० ते २२० रुपये किलो प्रमाणे तर मिरची पावडर २६० ते २८० रुपयांपर्यंत एक किलो प्रमाणे विकली जात आहे.
धर्माबाद शहर हे मिरचीसाठी प्रसिद्ध असलेले शहर म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या भागात मिरची लागवडीचे उत्पादन क्षेत्र कमी असले तरी या भागातील शेतकऱ्यांना शासनाकडून विविध योजनेद्वारे मिरची लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच परिसरात मिरची संशोधन केंद्र उभारणी केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल तसेच शेतकरी मिरची लागवडीकडे वळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. धर्माबाद शहर मिरचीच्या व्यापार पेटीमुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यातील मोठ्या प्रमाणात ग्राहक मिरची खरेदीसाठी येतात तसेच अनेकांना मिरचीचे देठ काढण्यापासून ते मिरची पावडर बनवून पॅकिंग करण्यापर्यंतचे कामाचा रोजगार उपलब्ध होत असल्यामुळे लगतच्या दोन ते तीन राज्यातूनही अनेक रोजगार या कामासाठी धर्मात शहरात वास्तव्यास आहेत.
तेजा मिरचीला अधिक मागणी
धर्माबाद च्या प्रसिद्ध मिरची बाजारपेठेत तेजा मिरचीला अधिक मागणी असून, या मिरचीपासून तेल तयार करण्यात येते. तेलंगणातील खंम्मम येथे याची फॅक्ट्री आहे. त्यामुळं बाहेर पाठवण्यावर भर दिला जात आहे.धर्माबाद येथे १९८४ साली मिरची पावडर बनविण्यासाठी मिरची कांडप सुरू केले.यानंतर दिवसेंदिवस यात प्रगती होय.मिरची पावडरची पँकींगही इथेच करण्यात येत असुन डी.एम.एच.या नावाने मिरची पावडरही बनवून देश-विदेशात पाठविण्यात येते.असे धर्माबाद येथील मिरचीचे व्यापारी तथा औद्योगिक वसाहतीचे चेअरमन शेख अमिरोददीन यांनी सांगितले