धर्माबाद (प्रतिनिधी) तालुक्यातील बाभळी बंधारा येथील गोदावरी नदीच्या पूलावरून संदीप चंद्रशेखर सब्बनवार वय २७ वर्ष यांनी आजाराला कंटाळून गोदावरी नदीत उडी मारून जीवनयात्रा संपवली असल्याचे शुक्रवारी दुपारी उघडकीस आल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद शहरापासून जवळच असलेले बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील रहिवाशी संदीप चंद्रशेखर सब्बनवार वय २७ वर्ष हा गेल्या अनेक महिन्यांपासून आजाराने त्रस्त झाला होता. वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेऊन सुद्धा संदीपचा त्रास कमी होत नव्हता. कुंडलवाडी येथे संदीपचे मोबाईल शाॅपी असून तो शांत स्वभावाचा होता. शेवटी आजाराला कंटाळून शुक्रवारी दुपारी बाभळी बंधारा येथील गोदावरी नदीच्या फूलावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील,भाऊ,पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. कुंडलवाडी येथे सुप्रसिद्ध सब्बनवार शाळा असून त्यांच्याच परीवारातील तो सदस्य असल्याचेही सांगण्यात आले आहे. धर्माबाद येथील सुप्रसिध्द व्यापारी अशोक लालन्ना येम्मेवार यांचा संदीप हा लहान मेहूना होता. गोदावरी नदीतून मयत संदीपला बाहेर काढण्यासाठी भोई समाजाचे कोंडलवाडी येथील भोई नागुलवार व धर्माबाद येथील सामाजिक कार्यकर्ते राजू नरसिमलू दलालवाड रत्नाळी, चक्रम गंगाधर आकुलोड अतकुर.यांनी परीश्रम घेऊन गोदावरी नंदी पात्रातुन बाहेर काढले
