पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची अवैध गांजा विरुद्ध सर्वात मोठी कारवाई

एकूण 147 किलो गांजा जप्त 40 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पंढरपूर तालुका व शहर पोलिसांकडून जप्त

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर येथील अहिल्यादेवी चौकात दि.०५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन पंढरपूर विभाग पंढरपूर यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे पंढरपूर तालुका पोलिसांनी अहिल्यादेवी चौकात नाकाबंदी करण्यात आली होती. सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स वि 500 कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून सदर वाहनाची तपासणी केली असता या वाहनांमध्ये प्रदीप दत्तात्रय हिवरे वय 20 वर्षे राहणार पुरंदावडे ता. माळशिरस जिल्हा सोलापूर याच्याकडे विचारपूस करताना सदर कारमध्ये मधल्या सीटवर,पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्र वासाचा एकूण 72 पाकिटामध्ये पॅक करण्यात आलेला दिसून आला .

यावेळी जागीच शासकीय पंचांच्या उपस्थितीत त्याचे वजन केले असता एकूण 147 किलो ग्रॅम वजनाचा गांजा व महिंद्रा xuv500 तिचा नंबर MH 12 HV 5666 ही कार असा एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. सदर गाडीतील प्रदीप दत्तात्रय हिवरे वय २० वर्षे राहणार पुरंदावडे ता.माळशिरस व त्याचे तीन साथीदार गणेश हनुमंत पवार राहणार चिंचपुरी ता.माळशिरस प्रमोद उर्फ सोनू मुळीक राहणार गुरसाळे ता.माळशिरस यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस NDPS ॲक्ट कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंढरपूर तालुका व शहर पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्धची कारवाई आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, पीएसआय विक्रम शेठ वडणे, पीएसआय भारत भोसले,पीएसआय श्री. घुंगुरकर, पीएसआय श्री.पिसाळ,सहा.फौजदार विजय गायकवाड,सहा.फौजदार दत्तात्रय तोंडले, सहा.फौजदार शरद कदम,पो.हवालदार विनायक क्षीरसागर ,पो.कॉन्स्टेबल अमोल गावडे, सुजित उबाळे,पो.हवालदार मंगेश रोकडे,पो.कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर, पो.हवालदार सूरज हेंबाडे ,पो.हवालदार सचिन हेंबाडे,पो.हवालदार प्रसाद औटी,पो.कॉन्स्टेबल समाधान माने,पो.कॉन्स्टेबल शहाजी मंडले यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Back To Top