मरवडे–उमदी रोडवर भीषण अपघात: भरधाव चारचाकीची धडक; एकाचा मृत्यू, दोघी जखमी
चारचाकी कार चालक फरार; मृत दादा शेळके यांच्या नातेवाईकांची पोलिसात तक्रार नोंद
मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/१२/ २०२५ : मरवडे ते उमदी रस्त्यावर बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता झालेल्या भीषण अपघातात दादा बाबा शेळके वय वर्षे 49, रा.खुपसंगी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून छाया दादा शेळके वय वर्षे 45 आणि मनिषा बापू शेळके वय वर्षे 41 या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात चारचाकी कार क्र. MH 13 BN 0134 ने दिलेल्या भरधाव धडकेमुळे घडल्याचे फिर्यादी संजय उमाजी चौगुले यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार तिघेही मरवडे –उमदी मार्गावरील हरी जाधव यांच्या घराजवळ मोटारसायकल (क्रमांक MH 13 DL 5471 थांबवून उभे असताना चारचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात वाहनाने येऊन समोरून जोरदार धडक दिली.अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळा वरून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी मंगळवेढा पोलिस ठाणे गु.र.नं. 1031/2025 नोंद करत चालकाविरुद्ध BNS कलम 281, 106(1), 125(a), 125(b) तसेच मोटारवाहन अधिनियम कलम 184, 134(A)(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा तपास पोहेकॉ 1621 श्री पवार हे करत असून प्राथमिक चौकशीअंती आरोपीचा शोध सुरू आहे.मंगळवेढा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
