श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न

श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका श्रीमती मालन वसंतराव काळे यांच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त भाळवणी ता पंढरपूर येथे,मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन भाळवणी चे सरपंच रणजित जाधव यांनी केले.माजी संचालक ज्ञानोबा खरडकर,म्हेत्रे काका, माजी सरपंच दिलीप भानवसे,डॉ कवडे,सुभाष म्हेत्रे,डॉ सुधीर शिनगारे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जनकल्याण हॉस्पिटल चे वतीने शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रास्तविकामध्ये डॉ सुधीर शिनगारे यांनी जनकल्याण हॉस्पिटल चे वतीने चालू असलेल्या उपक्रमांची व हॉस्पिटल मधील सुविधांची माहिती दिली.या शिबिरामध्ये शुगर ,ब्लड प्रेशर तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली.सदरचे शिबिर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत घेण्यात आले.एकूण 76 रुग्णांनी याचा लाभ घेतला.डॉ सौ अमृता म्हेत्रे- कबाडे यांनी त्यांचे दवाखान्यात जनकल्याण हॉस्पिटल चे वतीने शिबिर घेवून रुग्णांची सेवा केल्याबद्दल सरपंच रणजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

सदर आरोग्य शिबिरामध्ये डॉ सौ जयश्री शिनगारे,डॉ सौ अमृता म्हेत्रे- कबाडे,डॉ राजेंद्र माने,डॉ शुभम शिनगारे यांनी रुग्ण तपासणी करून मोफत उपचार केले.सदर कार्यक्रमास स्टाफ दिनकर शिंदे,प्रफुल कांबळे,अनिकेत कबाडे,अमृता कलढोणे ,सोनाली वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top