सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने कर्तुत्ववान वडिलांचा सत्कार संपन्न
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ पंढरपूरचे मूळचे रहिवाशी असणारे डॉ. सचिन मर्दा यांचे वडील सुभाष मर्दा यांचा सन्मान सुप्रभात मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे संपन्न झाला.

डॉ.सचिन मर्दा हे गेली तेरा वर्ष हैदराबाद येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये कॅन्सर तज्ञ म्हणून आपली सेवा देत आहेत.इंग्लंड मधील ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स इंग्लंड या पुस्तकात त्यांच्या कार्याची दखल घेतली असून त्यांनी लिहलेले आय एम नॉट स्टॉपेबल हे पुस्तक इंग्लंड मधील वैद्यकीय क्षेत्रातील वाचकांना आवडले असून तेथील वैद्यकीय क्षेत्रातील नामवंतांनी मुंबई येथे त्यांचा येऊन सन्मान केला.
गेल्या तेरा वर्षांमध्ये 14 हजार पेक्षा जास्त कॅन्सरवरील शस्त्रक्रिया रोबोटिक व सर्जरी या दोन्ही पद्धतीने डॉ.सचिन मर्दा यांनी यशस्वीपणे केल्या असून अनेकांना त्यामुळे जीवदान मिळाले आहे. डॉ.सचिन मर्दा यांचे वडील सुभाष मर्दा हे सुप्रभात मित्रपरिवाराचे सदस्य असून दररोज सकाळी व्यायामा बरोबरच वैचारिक देवाण-घेवाण करणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या या मंडळातील सदस्यांनी आज कर्तृत्वान मुलाचा पिता ही तितकाच कर्तृत्वान आहे म्हणून सन्मान केला.
यावेळी सुप्रभात मित्र परिवाराचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख, सदस्य कल्याणराव काळे व मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.
