सोलापूर:- सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत शिक्षक सेल अध्यक्षपदी “सुबोध रमेश सुतकर” यांची नियुक्ती करण्यात आली. सदरचा नियुक्ती आदेश खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते, चेतन नरोटे- अध्यक्ष सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रकाश यलगुलवार-माजी आमदार, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, काँग्रेसचे सर्व आजी-माजी नगरसेवक- महापौर, सर्व फ्रंटल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन, सोलापूर येथे देण्यात आले.
काँग्रेस ही एक विचारधारा आहे, सामाजिक सलोख्यासाठी ही विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये सर्व घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्याची ग्वाही सुबोध सुतकर यांनी दिली.
सदर कार्यक्रमास सोलापूर शहर जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बहुसंख्य उपस्थिती होती.