सोलापूर:- जय भारत प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी वारी बालदिंडी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . या सुमंगल कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सिद्राम फुले गुरुजी चेअरमन जय भारत प्राथमिक शाळा यांनी स्वीकारले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. मारुती माळगे साहेब शालेय समिती सदस्य,सचिव श्री.दीपक फुले सर,मुख्याध्यापक श्री. नारायण सूर्यवंशी सर , तसेच शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विठू माऊलीच्या पालखी पूजनाने करण्यात आली. त्यानंतर परिसरातून बाल दिंडी काढण्यात आले या दिंडीत विठ्ठलाची भूमिका- चि. राहुल फुले,चि .समर्थ दिड्डी, रखुमाईची भूमिका -आरोही म्हेत्रे, रिया परदेशी ,संत तुकाराम -अनिकेत पल्लोल्लू , संत ज्ञानेश्वर -संस्कार पवार,संत मीराबाई – सानवी बाबावाले ,संत बहिणाबाई -योगिता गुंगेवाले आणि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी वेशभूषा होते. विठू माऊलीच्या भक्ती गीतावर नृत्य सादरीकरण करत तसेच विठू नामाच्या जयघोषात बालदिंडी संपन्न झाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गाटे सर,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. म्हेत्रे मॅडम तर आभार कु. लेंगरे मॅडम यांनी केले.
