आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर राज्यउत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

सोलापूर दि.02:- राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांचे आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर सोलापूर शहर व जिल्हा परिसरात केलेल्या अवैध हातभट्टी निर्मिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री वाहतुकीवर व अवैध धाब्यावर केलेल्या धडक कारवाईत रूपये 14,45,400/- रुपयाचा मुद्देमाल जप्त.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची  साहेब विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार व  अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्रीमती भाग्यश्री पं. जाधव,  उपअधीक्षक  एस आर पाटील याचे मार्गदर्शनाखाली दि. 01 जुलै 2025  रोजी 15 गुन्हे नोंद करुन राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केंद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाई 9550 ली. रसायन, 235 लि. हातभट्टी दारु, 194.22 ब. लि. देशी मद्य, 30.24 ब.ली. विदेशी मद्य. 78 ब.लि. बिअर तसेच एक चार चाकीवाहनासह एकुण रूपये 14,45,400/- रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच दि. 01 जून व 30 जून 2025 या कलावधीत रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांची सोलापूर शहर व जिल्ह्यात केलेल्या अवैध हातभट्टी निमिती केद्रावर/अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीवर केलेल्या धडक कारवाईत एकुण 229 गुन्हे नोंद करण्यात आले असुन 214 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाईत 65,550 ली. रसायन, 5793 लि. हातभट्टी दारु, 499 ब. लि. देशी मद्य, 128 ब.ली. विदेशी मद्य, 102.32 ब.ली. बिअर, 2467 ली. ताडी, 1260 ब.ली.गोवा

बनावटीचे विदेशी मद्य तसेच 27 वाहनासह एकुण रूपये 10337238/-रुपयाचा प्रोव्हि. गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच सोलापूर शहर परिसरात अवैध हातभट्टी दारु व ताडी विकीवर कारवाई करण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

तसेच या विभागाकडुन सदर कालवधीत अवैध मद्य विक्री करणा-या व मद्य पिण्यास परवानगी देणा-या एकूण 27 ढाब्यावर गुन्हे नोंदविण्यात कारवाई करण्यात आलेली आहे.

सदर कारवाई निरीक्षक आर. एम. चवरे,  जे. एन पाटील,  ओ व्ही घाटगे,. राकेश पवार , पंकज कुंभार, सचिन भवड तसेच दुय्यम निरीक्षक एस डी कांबळे, नागरे, सुखदेव सिद, पोवार , सचिन शिंदे, श्रीमती अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक  मुकेश चव्हाण, मोहन जाधव, संजय चव्हाण, विजय पवार जवान सर्वश्री आण्णा करचे, नंदकुमार वेळापूरे, वसंत राठोड, चेतन व्हनंगुटी, प्रशांत इगोले अनिल पांढरे, विनायक काळे, पवन उगले, योगीराज तोग्गी, रेवणसिध्द कांबळे, स्वप्निल आरमाळ, योगेश गाडेकर, महिला जवान शिवानी मुढे, दिपाली सलगर वाहनचालक दिपक वाघमारे व सानप यांनी पार पाडली

अवैध मद्यविक्री, अवैध निर्मिती व वाहतूकी विरोधात कारवाई या पुढेही चालु राहणार असून ,अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री 18002339999 क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक 8422001133 यावर  कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल अशी माहिती  अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क. श्रीमती भाग्यश्री पं. जाधव,यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top