विकास आणि प्रगतीसाठी राज्यात महायुतीचे सरकार यावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाची हीच भेट योग्य -विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची गणरायाकडे प्रार्थना

पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – गणेशोत्सव गेले अकरा दिवस महाराष्ट्रामध्ये आणि जगभरात अतिशय उत्साहाने साजरा होत आहे.नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन सजावटींचा उपयोग करून नवीन प्रकारच्या फुलांचा उपयोग करत असताना परंपरा आणि श्रद्धा याचा संगम आपल्याला बघायला मिळाला. पुढच्या वर्षापर्यंत विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील आपल्या सगळ्यांना महायुतीचे जे सरकार आहे ते प्रगतीच्या पथावर नेत आहे. त्यामुळे हा विकासाचा आणि प्रगतीचा रथ पुढे जात आहे.

आज केंद्रामध्ये आपले सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मी मनापासून शुभेच्छा देते आणि महायुतीच सरकार परत एकदा राज्यामध्ये नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली यावं आणि प्रगतीचा जो रथ आहे त्याची अशाच पद्धतीने महाराष्ट्राची चांगल्या प्रकारे घोडदौड चालू राहावी अशा प्रकारच्या शुभेच्छा विधान परिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलमताई गोऱ्हे यांनी बाप्पाला निरोप देताना दिल्या.
