राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्यानं मृत्यू



अकोल्यात मंगळवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केली. या घटनेच्या काही तासांनंतर गाडी फोडणाऱ्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. जय मालोकर असे या मयत तरुणाचे नाव आहे. 

अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड करण्या प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या अकोला जिल्हा महिला शाखेच्या अध्यक्षांसह13 मनसे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावर मनसे कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जात असल्याचे मिटकरी यांनी म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर पुण्यात पाणी तुंबल्यावरून टीका केली होती. तसेच अजित पवारांना उपमुख्यमंत्री केल्याने मिटकरी यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. मिटकरींच्या वक्तव्यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आणि अकोल्यात विश्रामगृहात अमोल मिटकरी असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. या कार्यकर्त्यांमध्ये जय मालोकर देखील होता.घटनेच्या काहीच तासांनंतर जयमालोकरचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.

Edited By- Priya Dixit 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top