घरफोडीतील गुन्हे उघडकीस – पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

घरफोडीतील गुन्हे उघडकीस — पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

दोन आरोपी अटकेत; ७ तोळे सोन्याचे दागिने, २८० ग्रॅम चांदीचे दागिने, रोकड व मोटारसायकल असा एकूण ₹६.५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५ नोव्हेंबर २०२५ : घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीतील दोघांना अटक करून एकूण ०५ गुन्हे उघडकीस आणून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट, रोख रक्कम, मोटार सायकल असा एकूण सुमारे ८,५०,०००/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत केला स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ने कारवाई केली.घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे.

आळेफाटा पो.स्टे. गु.र.नं. २७७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ कलम ३०५ (अ) ३३१ (३) प्रमाणे दि.०९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी विक्रम महादू महादू डेरे वय २० वर्षे,रा. मंगरूळ,ता.जुन्नर जि पुणे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावून पारगाव येथे गेले असताना दि. ०९/१०/२०२५ रोजी दुपारी १२/०० ते ०३/०० वा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप तोडून दरवाजावाटे आत प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण साडे तीन तोळे वजनाचे एकूण १,७५,०००/- किंमतीचे चोरी करून नेले आहेत. घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरील प्रमाणे फिर्याद नोंदविली आहे.

दिवाळी सणाचे सुरूवातीस जुन्नर, खेड उपविभागात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सदरचे मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून सुचना केल्या होत्या.सदर गुन्ह्यांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करणेत आला. घटना स्थळांची पाहणी करून सदर घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती,गुन्हे पद्धत एक सारखीच होती.वरील गुन्ह्यामध्ये सुमारे १०० किमी पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. गुन्ह्यामध्ये एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरील दोन संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.तसेच प्रत्येक घटनास्थळावरून संशयित मोटार सायकल ही अहिल्यानगरच्या बाजूकडे गेली होती.

संशयित मोटारसायकलचा व आरोपींचा स्था.गु.शा. व आळेफाटा पो.स्टे.कडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की,गुन्ह्यातील संशयित मोटारसायकल ही युनिकॉर्न मोटार सायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले,किशोर हापूस भोसले दोघे रा.कासाटी, आष्टी,जि बीड हे वापरत असून त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले.

तपास पथक हे आरोपींचा शोध घेत असताना दोन्ही आरोपी आळेफाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने आळेफाटा परिसरात पथकाने सापळा रचून आरोपी १) मोहन भिकाजी भोसले वय २० वर्षे, २) किशोर हापूस भोसले वय २० वर्षे, दोघे रा. कासाटी, आष्टी, जि बीड यास युनिकॉर्न मोटार सायकलसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे कडे चौकशी केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना अधिक विश्वासात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

वरील आरोपींकडून एकूण ७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, १८० ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट, रोख रक्कम,मोटारसायकल असा एकूण सुमारे ८,५०,०००/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. दोन्ही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडी मध्ये आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,पुणे विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो.नि. विश्वास जाधव, मंचर पो स्टे चे पोनि श्रीकांत कंकाळ, नारायणगाव पो स्टे चे सपोनि प्रविण सपांगे, स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार,पोसई अमित सिदपाटील,अंमलदार विक्रम तापकीर,दिपक साबळे,हेमंत विरोळे,संदिप वारे,अक्षय नवले,निलेश सुपेकर,आळेफाटा पो स्टे चे श्रेणी पोसई सतिश टाव्हरे,अमित म्हाळुंजे,विनोद गायकवाड,पंकज पारखे, नवीन आरगडे,गणेश जगताप,ओंकार खुणे यांनी केली आहे.

पोलिसांचे आवाहन :

घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस सतत प्रयत्नशील आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना कळवावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top