ICC T20 क्रमवारीत स्मृती मंधानाला मोठा फायदा


smruti mandhana
महिला टी-20 आशिया कपच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामना वगळता संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती.स्मृती मंधाना आणि रेणुका यांच्या ICC T20 क्रमवारीत वाढ झाली आहे. 

 

स्मृती मानधना वगळता इतर सर्व फलंदाज महिला टी20 आशिया कप 2024 च्या अंतिम फेरीत फ्लॉप ठरले. मंधानाने 60 धावांची शानदार खेळी केली होती

 

 मंधानाला ICC महिलांच्या T20 क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला आहे. ती चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तिचे 743 रेटिंग गुण आहे.

 

स्मृती मानधना ही ICC T20 क्रमवारीतील फलंदाजांच्या टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. त्यांच्याशिवाय शेफाली वर्मा 11व्या क्रमांकावर आहे. शेफालीचे 631 रेटिंग गुण आहेत. गेल्या काही काळापासून त्याने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर 16 व्या क्रमांकावर आहे. त्याचे 607 रेटिंग गुण आहेत आणि पाच स्थान गमावले आहेत. 

भारताच्या रेणुका सिंगने ICC महिलांच्या T20 क्रमवारीत मोठी प्रगती केली आहे. चार स्थानांच्या प्रगतीसह ती पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.तिचे  सध्या 722रेटिंग गुण आहेत. तिने महिला आशिया चषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती आणि स्पर्धेत 7 विकेट घेतल्या होत्या. इंग्लंडची सोफी एस्लेटन अव्वल तर दीप्ती शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. दीप्तीचे 755 रेटिंग गुण आहेत.

Edited by – Priya Dixit   

 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top