ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्यावतीने गुरुवारपासून फॉर्म भरण्यात येणार
राज्यातील 65 वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी आणि वयपरत्वे येणारे अपंगत्व यामध्ये मदत करण्यासाठी सुरू
फलटण/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/२०२४- महाराष्ट्र शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात जगण्यासाठी आणि वयपरत्वे येणारे अपंगत्व यामध्ये मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचे फॉर्म माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन च्या वतीने गुरुवारपासून भरण्यात येणार आहेत .

पात्र जेष्ठ नागरिकांनी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनुप शहा यांच्या संपर्क कार्यालयात भरण्यात येणार आहेत तरी याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन फलटण शहर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या योजनेनुसार जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात शासनाकडून देण्यात येणार असून याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. फॉर्म भरण्यासाठी येताना नागरिकांनी आधार कार्ड ,मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, शक्य असल्यास शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो घेऊन यायचे आहेत .सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सदरचे फॉर्म भरले जाणार असून पात्र व इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी नागरिकांनी अनुप शहा यांच्याकडे दूरध्वनी नंबर 9689941008 या क्रमांकावर संपर्क साधावा.