महाराष्ट्राचा अर्थसंकल्प महिलांच्या प्रगतीचे चेतनाचक्र – महायुती महिलांची कैवारी
ना.एकनाथ शिंदे ,ना.देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवारांचा अर्थसंकल्प ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा
पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२८/०६/२०२४- महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०२४-२५ जाहीर झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नव्हे तर भारतामध्ये सुद्धा अशा पद्धतीने महिलांना केंद्रस्थानी ठेऊन विकासाची वाटचाल वेगवान केलेली आहे.हा जो अर्थसंकल्प आहे तो महिलांना केंद्रित ठरवून हा अर्थसंकल्प केलेला आहे. त्या दृष्टिकोनातून हे महिला धोरण १९९४ चे पार्श्वभूमी आणि नंतरचे चौथे महिला धोरण यांच्याशी नाते सांगते.
या पार्श्वभूमीवर अनेक योजनां यापूर्वी शासनाने जाहीर केल्या असतील तरी एकूण १५ योजनाच्या संदर्भात घोषणा आजच्या या अर्थसंकल्पात झालेल्या आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, घरातील मुलींना प्राधान्य देण्याबरोबर तिची आई आणि तिच्यावरती असणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये असलेले लेक लाडकी या सुद्धा स्त्रियांना मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे.सारांशाने सांगायचे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी ४६००० कोटी, लेक लाडकी योजना १०० कोटी,पिंक ई रिक्षासाठी ८० कोटी,सामूहिक विवाह साठी १०० कोटी, कर्करोग तपासणीसाठी ८७ कोटी,नवीन रुग्ण वाहिका खरेदीसाठी २०० कोटी,लखपती दीदी या योजनेसाठी ४०० कोटी, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना साठी १४०४ कोटी,अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी ४४०६ कोटी,महिला स्टार्ट अप साठी १०० कोटी, मुलींना मोफत उच्च व तंत्रशिक्षण साठी २००० कोटी असे ५४८८७ कोटीच्या योजना महिलांसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये एकूण आपण पाहिले अर्थ संकल्पाचे काय स्वरूप आहे व किती स्त्रियांना मिळालेले आहे ? तर यामध्ये १८१६५ कोटीचा नियत व्याय प्रस्तावित करण्यात आला आहे. तो आधीच्या वर्षापेक्षा २० कोटी ने जास्त आहे. त्याखेरीज कार्यक्रम खर्चासाठी १९२००० कोटीचा नियत व्यय प्रस्तावित केलेला आहे. यामध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या १५८९३ कोटी आणि आदिवासी विकास साठी १५३६० कोटी चा नियत व्यय आहे. एकूण खर्चासाठी ६ लाख १२हजार २९३ कोटी पैकी तुटीचा अर्थसंकल्प आहे परंतु विकास साध्य करायचा आहे म्हणून स्त्रियांना आपल्या बरोबर आणुन तुम्ही एकट्या नाहीत तर तुमच्यासोबत महाराष्ट्राचे सरकार आहे हा संदेश देण्यामध्ये हे सरकार नक्कीच यशस्वी झाले आहे.
अनेक वर्षे स्त्रियांच्या सामाजिक चळवळीत काम करून महिला धोरणे तयार करण्यामध्येही काम केल्याने हे माझे मत झाले आहे.शिवसेना नेता आणि उपसभापती विधान परिषद या नात्याने हा अर्थसंकल्प अतिशय स्वागतार्ह व महिलांच्या कर्तुत्वाचा चांगल्या पद्धतीने गौरव करून ठोस आर्थिक सक्षमीकरणसाठी पाऊले उचलणारा आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून स्वागत करते व त्यांचे सर्व महिलांचेवतीने आभार मानते- विधानपरिषद उपसभापती नीलम गोर्हे