फलटण भाजपा शहराध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने गंगा पूजन करण्याचा बहुमान
फलटण/ ज्ञानप्रवाह न्यूज – वाराणसी येथे रोज होत असलेल्या गंगा आरती वेळी चे गंगा पूजन करण्याचा बहुमान फलटण शहर भाजपा अध्यक्ष शहा व परिवाराला गंगा आरती संयोजन समितीच्यावतीने देण्यात आला.
वाराणसी येथे होत असलेल्या विश्व प्रसिद्ध मंदिरात उपस्थित असलेल्या देश विदेशातील लाखो कुटुंबांमधून हा बहुमान देण्यात येतो. यावेळी पहिला कुटुंबाचा बहुमान फलटण येथील भाजपा शहराध्यक्ष अनुप शहा आणि परिवाराला मिळाला . गंगा आरती सुरू करण्यापूर्वी गंगा नदीचे पूजन विधिवत पद्धतीने अनुप शहा परिवाराकडून करण्यात आले आणि गंगा आरतीची सुरुवात अनुप शहा यांच्या हस्ते करण्यात आली.