नागपूर :- क्रिडा, कला आणि साहित्य असा आहे सिद्धार्थ कुलकर्णी प्रदीर्घ प्रवास….
1970 च्या दशकात महाराष्ट्रात शालेय शिक्षण क्षेत्रात तांत्रिक विषय हा सुरु झाला होता त्या पहिल्या बॅच ला असल्याने त्यांनी तांत्रिक विषय घेऊन सर्व शिक्षण पूर्ण केलं इंजिनियरिंग मधे आवश्यक्त शिक्षण पूर्ण करुन क्रिकेटची आवड असल्याने क्रिकेट कडे वळून शिवाजी पार्क वर क्रिकेट चे धडे गिरवले काही सामन्यात बक्षीस ही मिळवले पण त्याकाळी विशेष सहाय्य मिळाले नाही त्यामुळे त्यात यश मिळेल असे वाटले नाही आणि अस वाटत असतानाच चित्रपट क्षेत्रात (बॉलिवूड) मधे काम करण्याची संधी मिळाली आणि मग कसलही शिक्षण नसताना केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर १८ ते २० तास काम करुन ध्वनिमुद्रक कामात यश मिळवले आणि पहिल्याच चित्रपटात तांत्रिक विभागात विशेष अवॉर्ड मिळाले आणि मग मागे वळून पाहिले नाही आणि संकलक, लेखक, सहाय्यक दिग्दर्शक, दिग्दर्शक, संगीतकार, इवेंट मॅनेजर, प्रसिद्धी प्रमुख, पी.आर.ओ., कलाकार मॉडेल समन्वयक म्हणून यश मिळवले ज्यात हिंदी चित्रपट सृष्टीतील ९० च्या दशकातील जवळपास सर्वच सुपरहिट चित्रपटांशी संबंध आला. ज्यात प्रामुख्याने दिल,बेटा , घायल, मैने प्यार किया, हम आप के है कौन, ईश्वर, प्रेम प्रतिज्ञा, अग्निसाक्षी , खलनायक,….. ते गझनी,पार्टनर अशा अगणित यशस्वी चित्रपटांचा समावेश आहे… बॉलिवूड मधे जवळपास २८ वर्ष काम करताना २५० पेक्षा जास्त चित्रपटांचे ट्रेलर लिहिले आणि लिखाणात प्राविण्य मिळाले.
या संपूर्ण २८ वर्षांत जवळपास सहा पिढ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तसेच १८ अवॉर्ड मिळाली ज्यात हिंदी,मराठी, इंग्लिश, बंगाली, गुजराथी, साऊथ अशा विविध भाषांचा समावेश आहे….
लिखाणाची पार्श्वभूमी असल्याने fb सुरु झाल्यावर चारोळी, कविता, कथा लेखन असा प्रवास सुरु झाला….
एका साहित्य संमेलनात सक्रिय सहभागी झाल्यानंतर ज्यावेळी डॉ. जयप्रकाश घुमटकर (मराठी साहित्य मंडळांचे) राष्ट्रीय अध्यक्ष यांनी साहित्य मंडळात कार्यरत होण्याबद्दल विचारले आणि हो म्हणताच मला विदर्भ विभाग प्रदेश अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली ज्यात वर्धा, नागपूर येथे संमेलन आयोजित केली ज्यात नागपूरचे साहित्य संमेलन अभूतपूर्व यशस्वी झाले आणि या कार्याने प्रभावित होवून डॉ जयप्रकाश घुमटकर आणि पर्यायाने राष्ट्रीय समितीने माझा या कार्याबद्दल सत्कार करून मला मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी विनंती केली ही विनंती मान्य करताना त्यांना विदर्भातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत राहीन असे सांगितले तेही राष्ट्रीय समितीने मंजूर केले… आजच्या घडीला जवळपास चार हजार चारोळ्या आणि हजार एक कविता लिहिल्या असा माझा क्रीडा कला साहित्य हा प्रवास आहे. त्यांच्या या निवडीचे संपूर्ण महाराष्ट्रात स्वागत करण्यात येत असून त्यांना विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
