राष्ट्रीय डॉक्टर्स डे एसपीएम इंग्लिश स्कूल, सोलापूर येथे उत्साहात साजरा.

सोलापूर:-( उपसंपादक रत्नाकर लोंढे याजकडून) शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संचलित एस .पी. एम.इंग्लिश स्कूल, सोलापूर येथे दिनांक १ जुलै २०२५ रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ. सुनील कुमार बदावत आणि डॉ. रतन मेखला, Divisional Medical Officer,Railway Hospital, Solapur यांचे प्राचार्या श्रीमती संगीता कोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टरांविषयी भावना व्यक्त करताना त्यांना “मानवी रूपातील देवदूत” असे संबोधले. यामध्ये विद्यार्थ्यांनी डॉक्टरांचे आपल्या जीवनातील महत्व आपल्या मनोगतातून सांगितले.. इयत्ता पाचवीतील गार्विक मुळे, इयत्ता तिसरीतून पार्थ भांगे, इयत्ता दुसरीतून वैदेही पवार या विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली. पाहुणे डॉक्टरांनी वैद्यकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव शेअर करत विद्यार्थ्यांना सेवाभाव ठेवून कोणतेही क्षेत्र निवडा असा संदेश दिला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इयत्ता सहावीतील नवल माखनीकर हिने केले, तर विघ्नेश पवार इयत्ता पाचवी याने आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळा समितीचे स्थानिक अध्यक्ष माननीय श्री. राजेश जी पटवर्धन सर यांनीही शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय क्षेत्राबद्दलचा आदर आणि प्रेरणा अधिक वाढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top