जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे आंतराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा….. !

सोलापूर दि.26 (जिमाका):- मा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व मा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार, अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर ,एम.एस शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 26 जून 2025 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथे आंतराष्ट्रीय अंमली पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर चे सचिव मल्हार पी शिंदे यांनी अंमली पदार्थ सेवनकेल्याने त्याचे दुषपरिणाम खूप मोठया प्रमाणात मानवी जीवनावर होत असतात. असे प्रतिपादन केले, तर लोकअभिरक्षक कार्यालयाचे विधीज्ञ श्रीमती. देवयानी किणगी यांनी अंमली पदार्थामुळे मनुष्य मानसीक, शाररीक रित्या दुर्बळ होतो. त्याची कार्य क्षमता मंदावते, आजारपण वाढते, असे मत व्यक्त केले.

संगमेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. त्रऋतुराज बुवा यांनी अंमली पदार्थाचे परिणाम खोलवर असू शकतात. वेगवेगळे पदार्थ तुमच्या मेंदुवर दुष्परिणाम करु लागतात. असे मत व्यक्त केले.सदर प्रसंगी मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली “अंमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम याविषयावरील “तुम मत गिरना” लघुपट दाखवून जनजागृती करण्यात आले.यावेळी प्रसंगी महाविद्यायाचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे कर्मचारी उपस्थित होते. अशी माहिती अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top