योगाला आपल्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य भाग बनवा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आवाहन…..!

सोलापूर, दि. २१: योग हा ध्यान आणि व्यायामापुरतता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे. भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. योगाच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जिवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आज येथे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केले.

सोलापूरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्‍युरो, सोलापूर, जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग्य समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक कुलकर्णी बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपजिल्हाधिकारी अंजली मरोड, तहसिलदार श्रीकांत पाटील, शिक्षणाधिकारी कादर शेख, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुलाणी, उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे, ह.दे.प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा पाठक, उपमुख्याध्यापक मोतीबाने, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे, योग दिवस समन्वय समितीचे सदस्य मनमोहन भुतडा, रोहिणी उपळाईकर, नंदकुमार चितापुरे, अशोक गरड, रघुनंदन भुतडा, डी पी चिवडशेट्टी, संगीता जाधव, सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके आणि कार्यालय सहायक जे एम हन्नुरे आदी उपस्थित होते.

योग केवळ आसनांची मालिकाच नाही, तर शरीर, मन आणि आत्मा याचं एकत्रित स्वरूप आहे. योग दिन म्हणजे आपल्या जीवनशैलीकडे नव्यान पाहण्याची, अंतर्मुख होण्याची आणि आपणास लाभलेल्या या अनमोल परंपरेचा सन्मान करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी केले.

यावेळी प्रास्ताविकामध्ये श्री यादव म्हणाले, एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग ही यावर्षी योग दिनाची संकल्पना असून यंदाचे ११ वे वर्ष आहे. महाराष्ट्र मध्ये प्रथमच शहरातील सर्व योग संस्थानी एकत्रितपणे हजारोंच्या संख्येने योग दिन उत्साहात साजरा करत असल्याचे सांगितले..

यावेळी नृत्य निरंजन भरतनाट्यम डान्स अकॅडेमीची शिक्षिका जान्हवी दुदगीकर, वृद्धी कोठारी, नंदिनी बागडे, प्राप्ती गुजर,सौम्या बाकळे, श्रद्धा तोडामे, श्रुती भिंगे, पद्मश्री कोळी, अक्षरा वाघमोडे, द्रिती यमपल्ली, साक्षी कुलकर्णी, रामा पिंपळनेरकर, श्रुती माने आदींनी नृत्य योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशी योगासने करून उपस्थितांची मने जिंकली. अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सुरुवातीला जितेंद्र महामुनी, संतोष सासवडे, सोनाली जगताप व विद्या होनमुडे यांनी शंख वादन करून योगाभ्यासाची सुरुवात केली. आयुष्य मंत्रालयाने नेमून दिलेल्या प्रोटोकॉल प्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थेच्या कांचना श्रीराम, संगीता बिराजदार, रितू कटकधोंड, अनिता कुलकर्णी, सरोज लोंढे आरती आमनगी यांनी शिथिली करण्याचे व्यायाम घेतले. योग साधना मंडळाच्या वतीने रोहिणी उपळाईकर, जयश्री उमरजीकर, प्रियांका झिंगाडे, धनश्री देशपांडे, डा.मेघ:श्याम साखरे, संतोष खराडे, योगीराज कलुबर्मे यांनी उभी आसने घेतली व योग सेवा मंडळाच्या वतीने वासंती निंबाळकर, जितेंद्र महामुनी कालिदास कोंडा, सोनाली जगताप व विद्या होनमुडे यांनी बैठे आसने घेतली. पोटावरील झोपून करावयाची आसने सर्वोदय योग मंडळाचे धनश्री कुलकर्णी, जीवन कुमार अवताडे, बसवराज कराळे, सत्यवान कदम, राजेश्वरी आवताडे, गायत्री कदम यांनी घेतली. विवेकानंद केंद्राच्या वतीने रवी कंटली, हरीश टवाणी, प्रेरणा टवाणी, वेदांत कोमल मेरगु यांनी पाठीवरील योगासने घेतली. पतंजली योग पिठाच्या वतीने रघुनाथ बनसोडे यांनी प्राणायाम घेतले. गीता परिवाराच्या वतीने संगीता जाधव यांनी ध्यान धारणा करून घेतली.

यावेळी योग समन्वयक मनमोहन भुतडा लिखित सुखी जीवनाचा कानमंत्र या योग विषयावरील पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या योगगुरू स्पर्धेतील उमा झिंगाडे, रघुनाथ क्षीरसागर, बाळासाहेब पाटील, विद्या होनमोडे आणि रवी कंटली यांना उपस्थितांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेतील विजेते नर्मदा कनकी, स्मिता देशपांडे आणि मानसी मोकाशी यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता शहा यांनी केले. मनमोहन भुतडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच सोलापूर शहरातील पोलीस आयुक्तालयाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक ए एम ठोसर यांच्या नेतृत्वाखाली ए बी माने, एस वाय, माने, आय डी मालदार, एस बी ठोसर, पी ए जाधव,एस बी खाते, के जी गावडे, एम बी गाब्वान आणि एस आर साळुंखे या पोलीस बँड पथकाने अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच योग संचालनाच्या वेळी धून वाजवून उपस्थितीना मंत्रमुग्ध केले.

सदरील कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी सहा पासूनच उपस्थितांनी गर्दी केली होती. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे ओमाजी सातपुते, आनंद पेद्याला, प्रवीण शिवशरण, युवराज राठोड, तानाजी शिंदे, राज्य राखीव पोलीस दल १० चे पोलीस उपनिरीक्षक आर डी पवार, जिल्हा होमगार्ड कार्यालय, एन सी सी बटालियन 9, भारत स्‍काउट गाईडचे श्रीधर मोरे, अनुसया सिरसाठ, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, विवेकानंद केंद्र, गीता परिवार, सर्वोदय योग मंडळ, योग प्रभा मंडळ, अखिल भारतीय योग संस्थान आणि पतंजली योग पिठ,अण्णाप्पा काडादी हायस्कूल, शिवाजी प्रशाला, नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशाला, सिध्देश्वर कन्या प्रशाला आणि हरिभाई देवकरण प्रशालेचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top