सोलापूर:- राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ क गटाच्या उपाध्यक्षपदी शाम राजेपांढरे यांची निवड करण्यात आली आहे .ते सध्या न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राज्य महासंघाचे अध्यक्ष दिगंबर निकम यांनी श्याम राजेपांढरे यांच्या नावाची नुकतीच घोषणा केली आहे. तर सहसचिव म्हणून योगीराज पैठणकर, तर सदस्य म्हणून सदाशिव जाधव यांच्या नावांची निवड जाहीर करण्यात आली कर्मचारी हिताच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्य महासंघावर आपली वर्णी लागल्याचे दिगंबर निकम यांनी म्हटले आहे. त्यांच्या या निवडीचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे,ज्ञानेश्वर लिंबोळे,संजय कारले आणि तमाम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
