भवानीनगर : श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना लि.,भवानीनगरच्या नुकत्याच झालेल्या सन 2025 -30 या पंचवार्षिक निवडणूकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब , राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभलेला व पॅनल प्रमुख पृथ्वीराज बापू जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानीमाता पॅनल मधून सणसर गटातून रामचंद्र (सर) विनायक निंबाळकर (10929) व शिवाजी (दादा) रामराव निंबाळकर (10431) कारखान्याचे इतिहासात कसलाही पूर्वानुभव नसताना, नविन ,कोरी पाटी असताना, सणसरकर व 53 गावांतल्या सभासदांनी अजितदादा पवारसाहेब व दत्तात्रय मामा भरणे यांचे कुशल नेतृत्वाकडे व पृथ्वीराज बापू यांच्या अनुभवी व आश्वासक चेहऱ्याकडे पाहून भरभरून मतदान करून 5764 इतक्या उच्चांकी व विक्रमी मतांनी सभासदांनी निवडून दिल्याबद्दल आझाद तरुण मंडळ सणसरचे वतीने सणसर पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध डॉ.बाळासो खरे व श्री छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सणसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विजयसिंह(आबा) विनायकराव निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सणसर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य पार्थ बाबा निंबाळकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष हेमंतराव निंबाळकर, आझाद तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी प्रकाश शिंदे, शाहूआबा जाचक, रमेशदादा निंबाळकर, दिलीप उर्फ हणुसर निंबाळकर, नंदू पाटील, विजयसर शिंदे, किरण गायकवाड, योगेशदादा गोरे, सुखदेव पवार,घनश्याम भोईटे, विशाल निंबाळकर, अक्षय निंबाळकर, मिलिंद गाडे, रोहित पाटील, अमृत निंबाळकर, सुरेश ढगे, अभिजीत निंबाळकर, अण्णासो रायते, गौरव निंबाळकर अजिंक्य निंबाळकर, रविराज निंबाळकर, रोहित निंबाळकर,वैभव निंबाळकर इत्यादी व ग्रामस्थ उपस्थित होते.
रामचंद्र निंबाळकर सर व शिवाजी रामराव निंबाळकर यांच्या नुतन संचालक पदाच्या कार्यकाळामध्ये कारखाना लवकरात लवकर आर्थिक संकटातून बाहेर पडो व सभासदांना त्यांचे उसाला जास्तीत जास्त भाव मिळो. त्यांच्या या प्रयत्नांना आपण सर्व सभासद पिकवलेला संपूर्ण उस छत्रपती कारखान्यास गळीतास पाठवून व कामगारांनी आपणाला नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करून साथ देऊया. हिच या प्रसंगी सदिच्छा व त्यांना त्यांचे पुढील कार्यकाळास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
