सोलापूर — येथील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूक बधिर विद्यालयात महामानव , भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे सचिव या नात्याने सुनील दावडा बोलत होते. आपले शिक्षण ,वाचन आणि विचार हेच आपल्याला योग्य दिशा देतात हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध करून दाखवलं आणि ते देशाच्या घटनेचे शिल्पकार बनले असे ही ते यावेळी म्हणाले.
प्रारंभी रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा यांच्या आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेतील विशेष शिक्षिका विजया पिताळकर यांनी डॉ आंबेडकरांचा जीवन पट आपल्या मनोगतातून उलगडला.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ जानवी माखिजा, शाळेचे सचिव सुनील दावडा, शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, बळीराम पावडे, दौलत सीताफळे , रेणुका पसपुले, संध्या चंदनशिवे, विजया पिटाळकर, योगिता बोधले, सोमनाथ ठाकर, सकलेन बडेखान , आनंद पारेकर , गंगाधर मदभवी, अजित पाटील, साहेबगौडा पाटील, सोमनाथ थोरात, बाबासाहेब पवार, शबाना शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विशेष शिक्षिका रेणूका पसपुले यांनी मानले
